जेजुरी: जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. त्यावर नागरिकांना 31 ऑगस्टअखेर हरकती घेता येणार आहेत. 20 सदस्यांपैकी महिलांसाठी 11 जागा असून, पुरुष सदस्यांची संख्या 9 असणार आहे.
2011च्या जनगणनेनुसार जेजुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना जाहीर करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या 14,515 असून, यात 1909 अनुसूचित जाती व 273 अनुसूचित जमाती लोकसंख्या आहे. निवडणुकीसाठी शहरात 10 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागातून दोन याप्रमाणे 20 सदस्यसंख्या असणार आहे. नगराध्यक्षपद जनतेतून निवडले जाणार आहे. (Latest Pune News)
प्रभागरचना पुढीलप्रमाणे :
प्रभाग 1 - लोकसंख्या 1439 - पुणे-पंढरपूर रोड उत्तर बाजू, विद्यानगर परिसर, जय भवानी ढाबा ते हॉटेल गोकूळपर्यंतची वसाहत यांचा समावेश आहे.
प्रभाग 2 - लोकसंख्या 1713 - एस टी स्टँड परिसर, विश्रामगृह, पालखी मैदान, शासकीय तंत्रनिकेतन व बाजारतळाचा समावेश आहे.
प्रभाग 3 - लोकसंख्या 1404 - मोरगाव रोड परिसर, रेल्वे स्टेशन, साईबाबा मंदिर, एकतानगर, खोमणेवस्ती, टेलिफोन एक्सचेंज परिसर, मल्हार व्हिला, पाणीपुरवठा केंद्र व पोलिस ठाणे परिसराचा समावेश आहे.
प्रभाग 4 - लोकसंख्या 1667 - आनंदनगर, स्मशानभूमी, भापकरवस्ती, दुर्गामाता मंदिर ते पेशवे तलाव परिसराचा समावेश आहे.
प्रभाग 5 - लोकसंख्या 1356 - विठ्ठलवाडी परिसर, बारभाई आळी, लक्ष्मीमाता मंदिर, सातारा नाका, ग्रामीण रुग्णालय परिसराचा समावेश आहे.
प्रभाग 6 - लोकसंख्या 1280 - जेजुरी नगरपरिषद ते मशीद परिसर, सातभाई आळी, मारुती मंदिर ते महाद्वार रोड पूर्व, खोमणे आळी पश्चिम भाग यांचा समावेश आहे.
प्रभाग 7 - लोकसंख्या 1576 - पुणे-पंढरपूर रोड डावी-उजवी बाजू, सुवर्णयुग बँक परिसर, नगरपरिषदेसमोरील परिसर, कडेपठार कमान, एसी हुंडेकरी कॉलेज, आझाद चौक, जोशी आळी, कुंभारवाडा, मल्हार भक्तनिवास ते डबेवाला धर्मशाळा परिसराचा सामावेश आहे.
प्रभाग आठ - लोकसंख्या 1392 -शिव मल्हार पेट्रोल पंप, लवथलेश्वर परिसर, होळकर तलाव, कडेपठार रिसॉर्ट, एसपी कॉलेज, जानूबाई आळी परिसराचा समावेश आहे.
प्रभाग 9 - लोकसंख्या 1311 - दरेकरवाडा, पेशवेवाडा, गोडसे आळी, रामोशीवाडा, राजवाडा चौक ते नंदी चौक, महाद्वार पथ पश्चिम बाजू, होळकर वाडा या परिसराचा समावेश आहे.
प्रभाग 10 - लोकसंख्या 1407 - घडशी आळी, कृष्णाई मंदिर, मातंगवस्ती, लक्ष्मीनगर, दत्त मंदिर, जाधवराव विद्यालय या परिसराचा सामावेश आहे.
जेजुरी नगरपरिषदेत प्रभागरचनेची माहिती लावण्यात आली आहे. ज्या नागरिकांना त्यावर हरकत घ्यायची आहे अथवा सूचना द्यायची आहे, त्यांनी 31 ऑगस्टपर्यंत द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी केले आहे.