जेजुरी: जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी त्याच गावातील ६० वर्षीय आरोपीला जेजुरी पोलिसांनी अटक करून बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. झुंबर सीताराम खोमणे असे आरोपीचे नाव आहे.
जेजुरी पोलिसांनी या प्रकरणी दिलेली माहिती अशी की जेजुरी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात मंगळवारी( दि.११) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला सीताफळीच्या शेतात नेवून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
या घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर जेजुरी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संगीता राणे तपास करीत आहेत.