येरवडा : पुढारी वृत्तसेवा : खराडी, चंदननगर परिसरात कमी दाबाने व अवेळी पाणीपुरवठा होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयावर 'जल आक्रोश मोर्चा' काढला. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
नागरिकांनी हातात पाणीसमस्येचे फलक धरून या वेळी महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. परिसरातील पाणीसमस्यांची संबंधित अधिकार्यांनी तातडीने दखल घ्यावी, पाणीपुरवठा सुरळीत करून नागरिकांची गैरसोय टाळावी, आदी मागण्यांचे निवेदन या वेळी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांना देण्यात आले. या समस्येची दखल घेतली नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी माजी नगरसेवक महेंद्र पठारे यांनी दिला.
येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या वेळी मुख्य अभियंता नंदकुमार जगताप यांनी दिले. दत्तात्रय पठारे, प्रकाश चौधरी, अमित सालके, आत्माराम पठारे, सोमनाथ चत्तर, राज बेंद्रे, सूरज कोठावळे, निखिल गायकवाड, सायबू कद्रपूरकर, अविनाश खळदकर, बाळासाहेब बोडके, गणेश सानप आदींसह नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा