Jagadguru Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony entered Sri Nageshwar temple of Patas
पाटस (ता. दौंड) येथील गावात जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले Pudhari Photo
पुणे

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसाव्यासाठी पाटसच्या श्री नागेश्वर मंदिरात दाखल

पुढारी वृत्तसेवा

पाटस : पुढारी वृत्तसेवा

वरवंड (ता. दौंड) ते उंडवडी (ता. बारामती) हा २६ किलोमीटरचा सर्वांत मोठा टप्पा व अवघड वळणाचा घाट पार करण्यासाठी जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पाटस (ता. दौंड) येथील भागवतवाडी १५ मिनिटांची विश्रांती घेण्यासाठी आगमन होत असतानाच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पालखी सोहळ्याचे आगमन गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात होत असताना पाटसकरांनी या सोहळ्याचे स्वागत केले.

वरवंड (ता. दौंड) येथे गुरुवारी (दि. ४) मुक्कामी असणारा जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज शुक्रवारी (दि. ५) पहाटेची आरती घेऊन पाटस दिशेने मार्गस्थ झाला.

हा पालखी सोहळा सकाळी ९ वाजता पाटस हद्दीत दाखल झाला. त्यावेळी पालखी सोहळ्याचे पाटस ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले. ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिरात सकाळी ९ वाजता जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीने प्रवेश केल्यावर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते.

पाटस येथील श्री नागेश्वर मंदिरातील दुपारचा विसावा घेऊन पालखी सोहळ्याला नागमोडी वळणाचा अवघड ठरणारा रोटी घाट पार करण्यासाठी सर्व भाविकांना व वैष्णवांसाठी पाटस गावाकडून नेहमीप्रमाणेच गोड जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे भाविकांनी व वारकऱ्यांनी पाटसकरांचे भरभरून कौतुक केले.

तालुकावासीयांना निरोप देण्यासाठी बारामती तालुक्यात उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पुढील मुक्कामासाठी पालखी सोहळा १२ वाजता मंदिराबाहेर निघत घाट मार्गाकडे मार्गस्थ होणार आहे.

SCROLL FOR NEXT