श्री विठ्ठल-रुक्मिणीभोवती बसवली चांदीची मेघडंबरी

225 किलो चांदीचा वापर; सहअध्यक्ष औसेकर महाराजांची माहिती
Shri Vitthal-Rukmini Pandharpur
मेघडंबरीत विसावलेले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रूप Pudhari File Photo
Published on
Updated on

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभार्‍यातील श्री विठ्ठल-रुक्मिणीभोवती सागवानी लाकडाची, चांदीने मढवलेली मेघडंबरी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री उशिरा बसविण्यात आली. मेघडंबरीत विसावलेले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे रूप अधिकच विलोभनीय दिसत आहे.

Shri Vitthal-Rukmini Pandharpur
Ambadas Danve : अंबादास दानवेंचे निलंबन मागे

पुरातत्त्व खात्याच्या अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूरच्या श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जतन, संवर्धन आणि मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या कामा दरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भोवती असणारी मेघडंबरी काढून ठेवण्यात आली होती. सध्या गाभार्‍यातील काम मार्गी लागले असून, आता दोन्ही मूर्तींभोवती नव्याने सागवानी लाकडांची, चांदीने मढवलेली मेघडंबरी बसवण्यात आली.

Shri Vitthal-Rukmini Pandharpur
हिजबोलाने इस्रायलवर सोडले 200 रॉकेट

नवीन सागवानी लाकडाची मेघडंबरी श्री संत कबीर महाराज मठ व फडातर्फे ह.भ.प. विष्णू महाराज कबीर यांनी दान दिली आहे. श्री विठ्ठल मूर्तीभोवतीची 160 किलो वजनाची, तर श्री रुक्मिणीमातेभोवतीची 110 किलो वजनाची मेघडंबरी आहे. यासाठी 30 लाख 50 हजार रुपये खर्च आला आहे. ही सागवानी लाकडाची मेघडंबरी घडविण्याचे काम गेल्या कित्येक दिवसांपासून पंढरीत सुरू होते. या मेघडंबरीला चांदीने मढविण्यासाठी एका दानशूर भक्ताने दोन कोटी रुपये किमंतीची 225 किलो चांदी दिली आहे. ही चांदी लाकडी मेघडंबरीवर मढविण्यात आली आहे. यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागला.

Shri Vitthal-Rukmini Pandharpur
पुणे : बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी

दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम पुरातत्त्व विभागामार्फत 15 मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. ते काम आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर 30 जूनपासून थांबवण्यात आले आहे. मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यातील दोन्ही मूर्तींभोवतीच्या जुन्या मेघडंबरी देखील काढण्यात आल्या. परंतु, आता गाभार्‍यातील काम पूर्ण झाल्यामुळे त्याठिकाणी नवीन मेघडंबरी बसवण्यात आल्या आहेत. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरे समितीचे सदस्य उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news