पुणे

कोयत्याने दहशत माजविणारा जेरबंद ; नारायणगाव पोलिसांची कामगिरी

अमृता चौगुले

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : हातात लोखंडी धारदार कोयता फिरवून रस्त्यावर आरडाओरडा करून दहशत निर्माण करणार्‍या एकास नारायणगाव पोलिसांनी जेरबंद केले. नारायणगाव हद्दीतील गोकुळ डेअरीसमोर ही घटना घडली, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. राहुल रामअजोरे गौतम (वय 27, रा. कोल्हेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) असे जेरबंद करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती हातात लोखंडी धारदार कोयता फिरवून आरडाओरडा करत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांना मिळाली.

त्यानुसार शेलार हे पथकासह त्या ठिकाणी दाखल झाले. या वेळी राहुल गौतम हा कोयता फिरवून दहशत निर्माण करीत असल्याचे दिसून आला. त्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले व त्याच्याकडील कोयता जप्त केला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्नर न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेलार, पोलिस उपनिरीक्षक जगदीश पाटील, पोलिस हवालदार घोडे, पोलिस नाईक मंगेश लोखंडे, पोलिस शिपाई शैलेश वाघमारे, दत्ता ढेंबरे, गोरक्ष हासे, थोरात, केंद्रे, कोतकर, कोळी यांच्या पथकाने केली आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT