International Officers Training
पुणे : भारतीय नौदलातील 14 आणि श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, घाना, बांगलादेश व कॅमेरून येथील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींचा समावेश असलेल्या एकुण 28 अधिकार्यांनी लोणावळा येथील आयएनएस शिवाजी येथे सागरी अभियांत्रिकी हा अभ्यासक्रम (एमईएससी) यशस्वीरित्या पूर्ण केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्हाइस अॅडमिरल संजय साधू उपस्थित होते. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून अधिकार्यांनी विविध युद्धनौकांवर प्रत्यक्ष कौशल्य प्रशिक्षण घेतली. प्रशिक्षणार्थींनी सागरी अभियांत्रिकी उपकरणांच्या विविध ऑपरेशन्स आणि देखभालीची तांत्रिक कौशल्ये सादर केली.
समारंभाच्या परेड दरम्यान, विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या अधिकार्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट अभिनव सिंग रावत यांना सर्वोत्तम ऑल-राउंड ऑफिसर व सर्वोत्तम खेळाडू चषक, लेफ्टनंट इंद्रनील बॅनर्जी यांना इंजिन रूम वॉच कीपिंग चषक, बांगलादेश नौदलाचे लेफ्टनंट कमांडर एमडी अबू सुफियान यांना बेस्ट इंटरनॅशनल ऑफिसर ट्रेनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.