पुणे

भारतीय लष्कर अत्याधुनिक अन् सतर्क : लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय लष्कर अत्याधुनिक, चपळ, प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेणारे आणि सतत सतर्क आहे, असा विश्वास देशाचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी व्यक्त केला. खडकीतील बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप अँड सेंटरच्या (बीईजी अँड सी) 'ग्रुप डे' निमित्त बॉम्बे सॅपर्सशी संलग्न असलेल्या शीख लाइट इन्फंट्री आणि मराठा लाइट इन्फंट्रीच्या परेडचा आढावा घेतल्यानंतर जनरल पांडे बोलत होते.

पांडे म्हणाले, आज भारतीय लष्कर बदलाच्या एका टप्प्यातून जात आहे. गेल्या वर्षी लष्कराच्या परिवर्तनाच्या रोडमॅपची विस्तृत रूपरेषा मांडण्यात आली होती. आम्ही भविष्यातील युद्ध आव्हानांना तोंड देण्यास सक्षम होत आहोत. भारतीय लष्कराने गेल्या वर्षी लवचिक आणि धाडसी पद्धतीने सुरक्षा आव्हानांचा सामना केला. या वेळी बॉम्बे सॅपर्सचे कर्नल कमांडंट जनरल पांडे यांनी दोन शतकांतील समृद्ध इतिहास आणि सॅपर्सच्या योगदानाबद्दल सांगितले. 200 वर्षांहून अधिक वर्षांच्या इतिहासाचा त्यांनी आढवा घेत सैनिकांची शौर्यगाथा सांगितली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT