Independent Candidates Election Pudhari News Network
पुणे

Independent Candidates Election: मतदारांपर्यंत चिन्ह पोहोचविण्यासाठी अपक्षांना चार दिवस

नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकीतील प्रचारात पक्षीय उमेदवारांना आघाडी; अपक्षांसमोर मोठे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप उद्या (बुधवार, दि. 26) रोजी होणार आहे. चिन्ह मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचाराची गती वाढवणार असली तरी त्यांना मतदारांपर्यंत आपले चिन्ह पोहोचवण्यासाठी फक्त चार दिवस उपलब्ध राहणार आहेत.

या उलट, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे उमेदवार 21 नोव्हेंबरपासूनच चिन्हासह जोमात प्रचार करत आहेत. त्यामुळे पक्षीय उमेदवारांना मिळालेल्या आघाडीच्या तुलनेत अपक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 14 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. 21 नोव्हेंबर हा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. नगराध्यक्षपदासाठी 153 जण, तर नगरसेवक पदासाठी तब्बल 1 हजार 574 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय पक्षांकडून उमेदवारी प्राप्त झालेले उमेदवार अर्ज माघारीनंतरच चिन्हासह धडाक्यात प्रचार करत आहेत. मात्र अपक्षांना चिन्ह वाटप पाच दिवस उशिरा होणार असल्याने त्यांचा प्रचारकाल कमी झाला आहे. प्रचारासाठी शेवटचे सहा दिवस शिल्लक असताना, अपक्ष उमेदवार मतदारांच्या ओळखीचे असले तरी त्यांच्या चिन्हाची माहिती पोहोचविणे आव्हान ठरणार आहे. पक्षीय उमेदवारांच्या तुलनेत अपक्षांकडे संसाधनांची व कार्यकर्त्यांची कमतरता असते.

त्यांना आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी फक्त चार दिवस मिळणार असल्याने त्यांना मोठी धडपड करावी लागणार आहे. चिन्ह वाटपानंतर निवडणूक प्रचाराला चालना मिळते. अपक्ष उमेदवारांमुळे 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण होणार आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्याही निर्माण झाल्या असून, या उमेदवारांचे चिन्हदेखील बुधवारी (दि. 26) निश्चित केले जाणार आहे.

या निवडणुकीत एकूण 194 चिन्हे उपलब्ध

उमेदवारांकडून तीन प्राधान्यक्रमानुसार चिन्हांची मागणी घेतली जाते. एका चिन्हासाठी दोन किंवा अधिक उमेदवारांची मागणी असल्यास चिठ्ठीद्वारे (सोडत पद्धतीने) त्या चिन्हाचे वाटप केले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT