Indapur Tehsil Office Protest Pudhari
पुणे

Indapur Tehsil Office Protest: इंदापूर तहसील कार्यालयाविरोधात २५ नोव्हेंबरला सर्वपक्षीय मोर्चा; तहसीलदारांच्या निलंबनाची मागणी

कथित अनियमितता, नागरिकांची गैरसोय आणि प्रलंबित कामांवरून विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटना एकवटल्या

पुढारी वृत्तसेवा

इंदापूर: इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनियमितता, नागरिकांची गैरसोय आणि प्रलंबित कामांच्या प्रश्नावरून २५ नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या कारभाराची सखोल चौकशी करून त्यांचे तातडीने निलंबन करावे, ही प्रमुख मागणी आहे.

बुधवारी (दि.१८) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. या मोर्चात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे, शिवसेना (शिंदे गट), रयत क्रांती सेना, भटक्या विमुक्त जमाती संघटना, स्वाभिमानी लहुजी सेना, भीमा कोरेगाव विजयरणस्तंभ सेवा संघ यांसह विविध सामाजिक संघटना सहभागी होणार आहेत.

भाजप नेते प्रदीप गारटकर यांनी सज्जन शक्तींना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. हा प्रश्न एका पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा आहे, असे ते म्हणाले. गारटकर यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना टोला लगावला, ते म्हणाले, राज्यात युतीचे सरकार आहे.

आमचे केवळ भाजपचे सरकार असते तर मोर्चा काढायची गरज भासली नसती, इंदापूरच्या इतिहासात तहसील कार्यालयाविरोधात सर्वपक्षीय मोर्चा काढण्याची वेळ येणे गंभीर आहे. जनतेची कामे वेळेत व्हावीत, नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी हा मोर्चा आहे, असे प्रवीण माने यांनी सांगितले.यावेळी आकाश कांबळे, निवास शेळके, महारुद्र पाटील, राजेंद्र हजारे, नितीन शिंदे, महादेव सोमवंशी, नीलेश देवकर, तानाजी धोत्रे, संतोष मोरे, शरद चितारे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT