Indapur ST Bus Depo Fire Incident Pudhari
पुणे

ST Bus Fire Incident: इंदापूर बसस्थानकावर मध्यरात्री एसटीला आग; सुदैवानं प्रवासी बचावले

इंधन गळतीमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज; क्षणात बस जळून खाक, ५० प्रवासी सुखरूप

पुढारी वृत्तसेवा

  • क्षणात एसटी जळून खाक

  • मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांच्या सुमारास घडली घटना

  • एसटीतील ५० प्रवासी सुखरूप

  • सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही

  • धाराशिवहून पुण्याकडे निघाले होती बस

इंदापूर : इंदापूर बसस्थानकावर शनिवारी (दि. २५) मध्यरात्रीच्या सुमाराला उभ्या राहिलेल्या एसटीला अचानक आग लागली आणि काही समजायच्या आत या आगीत संपूर्ण एसटी जळून खाक झाली आहे. या एसटीमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. सुदैवानं कोणालाही इजा झाली नसली तरी या प्रवाशांचं साहित्य मात्र जळून राख झालं आहे. (Latest Pune News)

पुण्याहून धाराशिवकडे निघालेली एसटी बस (एमएच २० बीएल ४२३३) ही मध्यरात्री २.१० वाजता इंदापूर बसस्थानकाच्या फलाट क्रमांक ११ वर आली. याच वेळी इंधन गळतीमुळे या बसला अचानक आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

ज्यावेळी आग लागली त्यावेळी बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते. अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. प्रवाशांनी कसाबसा आपला जीव वाचवला. तात्काळ अग्निशामक बोलावून ही आग आटोक्यात आणली; मात्र या आगीत बस पूर्ण खाक झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT