Money Pudhari
पुणे

Indapur District Study Centre: मदनवाडीला अभ्यासिका व सांस्कृतिक सभागृहासाठी निधीचे आश्वासन

इंदापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल अभ्यासिका आणि ग्रामस्थांसाठी सुसज्ज सभागृह उभारण्याची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: मदनवाडी (ता. इंदापूर) येथील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक स्पर्धा परीक्षा अभ्यासिका आणि ग््राामस्थांसाठी सुसज्ज सांस्कृतिक सभागृह उभारण्यासाठी राज्य सरकारकडून भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. शेलार यांच्या दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पक्षाचे इंदापूर तालुकाध्यक्ष तेजस देवकाते यांनी मदनवाडी ग््राामस्थांच्या वतीने विकासकामांचे सविस्तर निवेदन दिले. या वेळी शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याचे शब्द दिल्याचे देवकाते यांनी सांगितले.

मदनवाडी आणि परिसरातील शेकडो तरुण-तरुणी सध्या यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत; मात्र गावात सुसज्ज अभ्यासिकेची सोय नसल्याने या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही अडचण ओळखून, तेजस देवकाते यांनी वाय-फाय, अद्ययावत संदर्भ ग््रांथ आणि पोषक फर्निचर असलेली ‌‘डिजिटल अभ्यासिका‌’ गावातच उभारण्याची आग््राही मागणी निवेदनात केली आहे. यामुळे ग््राामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहरासारख्या सोयीसुविधा मिळून त्यांच्या यशाचा मार्ग सुकर होणार आहे.

सांस्कृतिक वारशासाठी भव्य सभागृह

मदनवाडी गावाला भजन, कीर्तन आणि सामाजिक कार्यक्रमांची मोठी परंपरा आहे. परंतु, हक्काचे सभागृह नसल्याने पावसाळ्यात व उन्हाळ्यात सार्वजनिक कार्यक्रम घेताना ग््राामस्थांना कसरत करावी लागते. यावर उपाय म्हणून सर्व सोयींनी युक्त अशा ‌‘बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहाची‌’ मागणीही या वेळी करण्यात आली. या प्रसंगी इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सोबतच ग््राामपंचायतीचा अधिकृत ठराव देखील मंत्री शेलार यांना सुपूर्द करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT