पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सध्याचे जीवन हे खूप धावपळीचे आणि दगदगीचे आहे. बदलत्या जीवनशैलीत अनेक महिला आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे महिलांना थायरॉईड आजार होत आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये या आजाराचे पाच ते सात टक्के रुग्ण असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे.
थायरॉईड ही मानवी शरीरातील एक ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरात महत्त्वाचे काम करते. वेगाने ऊर्जा खर्च करणे, शरीरात किती प्रोटीन तयार होतात. सर्व बाबीवर या ग्रंथाचे नियंत्रण असते मानवी शरीरात ट्रायओडोथायरॉनाईन, थायरॉक्सिन हे दोन हार्मोन्स तयार होतात. तसेच हा आजार कोणत्याही व्यक्तीला वयाच्या कोणत्याही वर्षी होऊ शकतो. एखाद्या महिलेला थकवा येणे, वजन वाढणे, कोरडी रखरखीत त्वचा होणे, पातळ केस होणे, घोगरा आवाज अशी लक्षणे आढळल्यास त्याला थायरॉईडीझम म्हणतात.
अनेकांकडून या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतो. हायपो थायरॉइडीझम आणि हायपर थायरॉडिझम या आजारामुळे शरीरात गंभीर स्वरूपाची गुंतागुंत होऊ शकते. अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या, औषधे घेतात. त्यामुळे हा त्रास जास्त वाढण्याची शक्यता आहे. पर्यायाने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.
थायरॉईड रुग्णाला झाल्यास त्याला विविध प्रकारचे त्रास होतात. कमजोरी येणे, थकवा वाटणे, चेहरा सुजणे, जास्त झोप येणे, चिडचिडेपणा वाढणे, जेवण कमी होणे, हिमोग्लोबिन कमी होणे, अशा सर्व समस्या वाढतात. त्यामध्ये काहींना डोळ्यांच्या खालील भागात सूज येणे, एकाग्रतेचा भंग अशा बाबी जाणवतात. त्यामुळे याबाबत वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आपल्या शरीरामध्ये थायरॉईडचे प्रमाण किती आहे. टी -3, टी-4 त्याचे प्रमाण योग्य आहे का, याची खात्री करावी.
– डॉ. शिवाजी ढगे, वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय.
हायपो थायरॉइडीझम आणि हायपर थायरॉडिझम असे दोन प्रकार असतात. त्यामध्ये थायरॉइडीझमची विविध लक्षणे असतात. चेहरा सुजणे, उदासीन वाटणे, वजन कमी होणे, स्थूलपणा येणे, अशी लक्षणे आढळतात.
– डॉ. सुनील पवार, कान-नाक-घसा तज्ज्ञ, थेरगाव रुग्णालय.
केस गळणे, अशक्तपणा, थकवा जाणवणे, ही थायरॉईडची लक्षणे आढळल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. तसेच शरीराचे योग्य पोषण, योग्य आहार न घेतल्यासदेखील ही लक्षणे आढळतात. योग्य नियोजन केल्याने हा आजार लवकर बरा होतो.
– डॉ. निलेश लोंढे, आयुर्वेदिक तज्ञ.
हेही वाचा