पुणे

पिंपरी : पालेभाज्या, टोमॅटो आणि मिरचीच्या दरात वाढ

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तापमान वाढ आणि उष्णतेमुळे पालेभाज्या खराब होत आहेत. परिणामी शहरातील बाजारपेठांमध्ये पालेभाज्या, टोमॅटो आणि मिरचीच्या दरात वाढ झालेली आहे. तर, इतर भाज्यांचे दर स्थिर असल्याचे रविवारी दिसून आले. कोथंबिर, पालक आणि मेथीच्या जुडीची तीस ते चाळीस रुपये दराने विक्री झाली. हिरव्या मिरचीचे दर प्रतिकिलो 100 रुपये तर टोमॅटोचे दर 40 ते 45 रुपये इतके होते. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून टोमॅटोची 10 ते 15 रुपये प्रति किलो दराने विक्री होत होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.

वाढत्या तापमानामुळे उष्णता वाढत असून पालेभाज्यांची नासाडी होत आहे. त्यामुळे आवक घटली आहे. परिणामी गेल्या आठवड्यापासून दरात वाढ कायम आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी उपबाजारात कांद्याची आवक 535 क्विंटल, बटाटा – 1191 क्विंटल, टोमॅटो – 404 क्विंटल, मटार – 14 क्विंटल एवढी आवक झाली आहे. मोशी उपबाजारात पालेभाज्या एकुण 26700 गड्डी, फळे – 360 क्विंटल आणि फळभाज्यांची आवक – 3496 क्विंटल एवढी झाली.

पिंपरी मंडईतील पालेभाज्यांचे
किरकोळ भाव
पालेभाज्या ः दर (प्रति जुडी)
मेथी 30
कोथिंबीर 30 ते 40
कांदापात 25
शेपु 25
पुदिना 15
मुळा 20
चुका 20
पालक 30

फळभाज्यांचे प्रतिकिलोचे भाव

कांदा 25
बटाटा 30
लसूण 100
आले 100
मटार 90
भेंडी 60
टामॅटो 45
सुरती गवार 100
गावरान गवार 100
दोडका 40
दुधी भोपळा 50
लाल भोपळा 50 ते 60
कारली 40
वांगी 40
भरीताची वांगी 50
तोंडली 50
पडवळ 40
फ्लॉवर 50
कोबी 30
बिन्स 100
बीट 50
आवळा 60
राजमा 50
काकडी 40
शिमला 60
शेवगा 90

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT