यंदा 1 लाख 31 हजार कोटी करसंकलनाचे उद्दिष्ट; आयकर दिनानिमित्त मुख्य आयुक्त कृष्णा मुरारी यांची माहिती File Photo
पुणे

Income Tax: यंदा 1 लाख 31 हजार कोटी करसंकलनाचे उद्दिष्ट; आयकर दिनानिमित्त मुख्य आयुक्त कृष्णा मुरारी यांची माहिती

166 व्या आयकर दिनानिमित्त विमाननगर येथील सिम्बायोसिस सभागृहात आयकर विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कृष्णा मुरारी बोलत होते.

पुढारी वृत्तसेवा

Income Tax Collection 2025

पुणे: देशाच्या विकासात करदात्यांचे योगदान वाढत आहे. देशाच्या प्रगतीत करदात्यांची भूमिकाही महत्त्वाची आहे. पुणे विभागामध्ये करदात्यांची संख्याही वाढली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी पुणे विभागाने 1 लाख 31 हजार कोटी रुपयांचे करसंकलन लक्ष्य निश्चित केले आहे.

166 व्या आयकर दिनानिमित्त विमाननगर येथील सिम्बायोसिस सभागृहात आयकर विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कृष्णा मुरारी बोलत होते. आयकर महासंचालक (तपास) संदीप प्रधान व्यासपीठावर उपस्थित होते. (Latest Pune News)

मागील वर्षी पुणे विभागाचे करसंकलनाचे उद्दिष्ट 1 लाख 21 हजार कोटी रुपयांचे होते. करदात्यांना कर भरणे सोपे व्हावे, यासाठी आयकर कायद्यात सुधारणा करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य आयुक्त कृष्णा मुरारी यांनी दिली. त्यांनी आयकर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आयकर दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गेल्या तीन महिन्यांत पुणे विभागातील कर्मचार्‍यांच्या कठोर परिश्रमामुळे प्रलंबित तक्रारींची प्रकरणेदेखील निकाली काढण्यात आली आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

करदात्यांचा केला सत्कार...

या वेळी मुख्य आयुक्त मुरारी आणि आयकर महासंचालक (तपास) संदीप प्रधान यांनी पहिल्या पाच करदात्यांना पुष्पगुच्छ, प्रमाणपत्रे आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले. यासोबतच आयकर विभागाने आयोजित केलेल्या टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, कला आणि प्रश्नमंजूषा स्पर्धांसारख्या क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. पहिल्या पाच करदात्यांमध्ये बजाज फायनान्स लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड आणि वैयक्तिक करदाते म्हणून प्रज्ञा राठी, मयंक काळे यांचा समावेश होता.

आयकर विभागात डिजिटल परिवर्तन...

  • 2024-25 या आर्थिक वर्षात 9 कोटी 19 लाख आयकर विवरणपत्रे दाखल.

  • नवीन मोहिमा प्रकल्प अंतदृष्टी, डेटा विश्लेषणाद्वारे कर अनुपालन आणि कार्यक्षमता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणार.

  • आयकर विधेयक 2025 हे आयकर कायदा सुलभ करणार.

  • संसदेच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल.

  • भारतात सर्वप्रथम 24 जुलै 1860 मध्ये दिवशी जेम्स विलन यांनी आयकर सुरू केला.

राष्ट्रीय सकल उत्पादनात प्राप्तिकराचा टक्का वाढला...

प्राप्तिकर महासंचालक (तपास) संदीप प्रधान म्हणाले की, आमच्या काळात करसंकलनाचा वाटा जीडीपीच्या 1.9 टक्के होता. आता जीडीपीमध्ये आयकर संकलनाचा वाटा 5.6 टक्के झाला आहे. 2035 पर्यंत जीडीपीमध्ये आयकर विभागाचा वाटा 7 टक्के होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपायुक्त तन्मयी देसाई यांनी केले. स्वागत भाषण आयकर आयुक्त (प्रशासन, मुख्यालय) केयूर पटेल यांनी केले. अतिरिक्त आयुक्त शशांक देवगडकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT