पुणे

पुणे जिल्ह्यात 87 टक्के नागरिकांना दुसरा डोस

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यात तब्बल 72 लाख 30 हजार जणांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला असून एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 87 टक्के इतके आहे. अजूनही 13 टक्के नागरिक दुसर्‍या डोसपासून वंचित आहेत. दुसरा डोस घेतलेल्यांमध्ये सर्वाधिक लाभार्थी 18 ते 33 वयोगटातील असून त्यांची संख्या 42 लाख 65 हजार आहे. पहिल्या डोसचे लाभार्थी 110 टक्के आहेत.

जिल्ह्यात पुणे शहरात 30 लाख, पिंपरी-चिंचवडमध्ये 17 लाख 66 हजार आणि पुणे ग्रामीणमध्ये 35 लाख 75 हजार असे एकूण 83 लाख 42 हजार इतके लाभार्थी आहेत. त्यापैकी पुणे शहरात 35 लाख 68 हजार जणांनी, पिंपरी-चिंचवडमध्ये 17 लाख 52 हजार आणि पुणे ग्रामीणमध्ये 38 लाख 18 हजार अशा एकूण 91 लाख 40 हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे. म्हणजेच अपेक्षित लाभार्थी 83 लाख 42 हजारांचे उद्दिष्ट पार करून त्यापुढे 8 लाख लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. पुणे शहरात 119 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 99 टक्के, तर पुणे ग्रामीणमध्ये 107 टक्के असे हे प्रमाण आहे.दरम्यान, दुसरा डोस घेणार्‍यांचीही संख्या जास्त आहे. पुणे शहरात 28 लाख 45 हजार, पिंपरी-चिंचवडमध्ये 15 लाख आणि पुणे ग्रामीणमध्ये 28 लाख 83 हजार असे एकूण 72 लाख 30 हजार जणांना दुसरा डोस मिळाला आहे. म्हणजेच पुणे शहरात 95 टक्के, पिंपरी-चिंचवडमध्ये 85 टक्के, तर पुणे ग्रामीणमध्ये 80 टक्के लाभार्थ्यांना दुसरा डोस मिळाला आहे.

सव्वा लाख जणांनी घेतला दक्षता डोस

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात मिळून आतापर्यंत महिन्याभरात 60 वर्षांपुढील 1 लाख 24 हजार जणांनी दक्षता म्हणजेच बूस्टर डोस घेतला आहे. तिसर्‍या डोससाठी पुणे शहरात 95 हजार नागरिक पात्र असून त्यापैकी 64 हजार, पिंपरी चिंचवडमध्ये 56 हजारांपैकी 23 हजार आणि ग्रामीणमध्ये 1 लाख 13 हजारांपैकी 36 हजार जणांनी हा डोस घेतला आहे. म्हणजेच तिसर्‍या डोससाठी 2 लाख 65 हजार पात्र असून त्यापैकी 1 लाख 24 हजार जणांनी तिसरा डोस घेतला आहे.

आठवड्यात दुसर्‍या डोसचे लाभार्थी अधिक

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागामध्ये मिळून 27 ते 2 जानेवारी या आठवड्याच्या तुलनेत 3 ते 9 फेब—ुवारीदरम्यान पहिला आणि दुसरा डोस मिळून 1 लाख 3 हजार जणांनी लस घेतली आहे. यापैकी पुणे शहरात 18 हजार, पिंपरी चिंचवडमध्ये 5 हजार आणि पुणे ग्रामीणमध्ये 21 हजार अशा एकूण 45 हजार जणांनी या आठवड्यात पहिला डोस घेतला. तर, पुणे शहरात 22 हजार, पिंपरी चिंचवडमध्ये 14 हजार आणि पुणे ग्रामीणमध्ये 20 हजार अशा एकूण 58 हजार जणांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिल्या डोसच्या तुलनेत 13 हजार जणांनी दुसरा डोस जास्त घेतला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT