Exam  Pudhari
पुणे

CA Final Exam Changes: सीए फायनल परीक्षेत मोठा बदल; आता वर्षातून फक्त दोनदाच परीक्षा

आयसीएआयचा निर्णय लागू; 2026 पासून मे व नोव्हेंबरमध्येच परीक्षा होणार, विद्यार्थ्यांना मिळणार कमी संधी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्‌‍स ऑफ इंडिया अर्थात आयसीएआयने सीए फायनल परीक्षेच्या पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. ही परीक्षा वर्षातून तीन वेळा घेण्याऐवजी आता दोनदा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2026च्या सत्रापासून लागू होणाऱ्या या नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या संधीची संख्या कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी सीए फायनल परीक्षा जानेवारी, मे आणि सप्टेंबरमध्ये घेतली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून तीन संधी मिळत होत्या. परंतु, नवीन निर्णयानुसार ही परीक्षा आता फक्त मे आणि नोव्हेंबरमध्ये घेतली जाईल. आयसीएआयने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय विद्यार्थी आणि इतर संबंधित घटकांकडून मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे घेण्यात आला आहे.

या बदलाचा परिणाम फक्त सीए फायनल परीक्षेवर होईल. फाउंडेशन आणि इंटरमिजिएट परीक्षांसाठी सध्या कोणतेही बदल जाहीर केलेले नाहीत. अभ्यासक्रम, उत्तीर्ण होण्याचे गुण, आर्टिकलशिप किंवा अभ्यासक्रमाच्या रचनेत कोणताही बदल केलेला नाही. सीएची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वी वर्षातून तीन संधी मिळत होत्या, ज्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यास त्यांना त्वरित दुसरी संधी मिळवता येत होती. परंतु,

आता ही संख्या तीनऐवजी दोनवर आणली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कमी संधीमुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे तयारी करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. शिवाय, परीक्षांची संख्या कमी झाल्यामुळे आयसीएआयसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासणे आणि निकाल जाहीर करणे, ही प्रक्रिया सोपी होईल. यामुळे संपूर्ण परीक्षा प्रणाली अधिक मजबूत आणि प्रभावी होण्यास मदत होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

आयसीएआयने सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी 3 मे 2026 रोजी होणारी ही परीक्षा आता 5 मे रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतली जाईल. ग््रुाप 1 च्या परीक्षा 5, 7 आणि 9 मे रोजी, तर ग््रुाप 2 च्या परीक्षा 11, 13 आणि 15 मे रोजी घेण्यात येतील, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT