Shirur MD Drug Seize: शिरूरमध्ये एमडी ड्रग्ज जप्त; अल्पवयीन आरोपीकडून 1.38 लाखांचा मेफेड्रोन हस्तगत

बायपास परिसरात पोलिसांचा सापळा; नाना स्पॉट हॉटेलजवळ एमडी विक्री प्रकरणात अल्पवयीनाला ताब्यात घेऊन एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल
Drug
DrugPudhari
Published on
Updated on

शिरूर: शिरूर बायपास परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्रीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 6.94 ग््रॉम वजनाचा सुमारे 1 लाख 38 हजार 800 रुपयांचा मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.

Drug
Katraj Kondhwa Road Widening Project: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी वेग; 85 कोटींच्या भूसंपादनासह 2026 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणार

ही कारवाई शनिवारी (दि. 11) अमली पदार्थविरोधी मोहिमेदरम्यान करण्यात आली. शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद पडलेल्या नाना स्पॉट हॉटेलजवळ एमडी विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अमली पदार्थ आढळून आला.

Drug
Asha Bhosle: 22 मुलाखतींच्या आठवणींतून उलगडलेले आपुलकीचे ऋणानुबंध

याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम 8(क), 21(ब) तसेच बीएनएस कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलिस करत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे, पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर, नीरज पिसाळ यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news