पुणे

राज ठाकरे म्हणाले मी पुन्हा येईन

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मी पुन्हा येईन, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरूवारी (दि.10) सांगितले.
मनसेच्या पिंपरी येथील पिंपरी-चिंचवड शहर मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ठाकरे म्हणाले की, मी पुन्हा पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहे. त्यावेळी सविस्तरपणे पत्रकारांशी बोलणार आहे. आज मी काही बोलणार नाही. पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा येणार, हा माझा शब्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शहर परिसरात मोठमोठे होर्डिग व ध्वज लावण्यात आले होते. ढोल ताश्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.

भगवे फेटे घातलेले पदाधिकारी व कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. क्रेनच्या सहायाने भला मोठा हार घालून त्याचे शहरात स्वागत करण्यात आले. तसेच, चांदीची गदा व त्यांची चित्राच्या प्रतिकृती त्यांना भेट देण्यात आल्या. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत त्यांनी छायाचित्रे काढून घेत गप्पा मारला.

या वेळी मनसेचे नेते अनिल शिदोरे, अ‍ॅड. गणेश सातपुते, किशोर शिंदे, रणजित शिरोले, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले आणि पदाधिकारी उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT