HPCL Pudhari
पुणे

HPCL Action Against LPG Distributors: एचपीसीएलची वितरकांवर कारवाई; 27 परवाने निलंबित

4385 तपासण्या, हजारो सिलिंडर जप्त; देशात इंधन-एलपीजी तुटवडा नसल्याचे स्पष्टीकरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राज्यासह देशात सुरू असलेल्या गॅस आणि इंधनपुरवठ्यावर एचपीसीएल कंपनीने वितरकांवर बारकाईने लक्ष ठेवले असून, नागरिकांना जाणीवपूर्व त्रास देणाऱ्या वितरकांवर कारवाईचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत 27 वितरकांचे परवाने निलंबित केले आहेत. 14 मार्च ते 7 एप्रिल 2026 दरम्यान 4385 तपासण्या करत 74 वितरकांविरुद्ध कारवाई केली.

इतर तेल विपणन कंपन्या व राज्य प्रशासनाच्या सहकार्याने 657 छापे टाकून 40 गुन्हे दाखल केले, तसेच 3163 एलपीजी सिलिंडर जप्त केल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. निवडक बाजारपेठांमध्ये इंधन व एलपीजीची मागणी वाढल्याने हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ने देशभरातील पुरवठा व अंमलबजावणी यंत्रणा सक्रिय केली आहे. इंधन आणि एलपीजीचा अखंड पुरवठा सुनिश्चित करताना वितरण व्यवस्थेची सुसूत्रता राखण्यावर कंपनीने भर दिला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात एचपीसीएलने पुरवठा साखळीची कार्यक्षमता लक्षणीय वाढवली. 1 ते 7 एप्रिलदरम्यान कंपनीने 2लाख 64 हजार 548 किलो लिटर पेट्रोल (एमएस) आणि 4 लाख 77 हजार 30 किलो लिटर डिझेल (एचएसडी) विक्रीची नोंद केली. वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 48 हजार 99 टँकर्सद्वारे पेट्रोल, डिझेल आणि अनुदानित केरोसीन देशभरातील किरकोळ केंद्रांवर पोहोचवले. एलपीजी वितरण व्यवस्थाही पूर्णक्षमतेने कार्यरत असून, या कालावधीत 89 लाख सिलिंडर वितरित करण्यात आले.

स्थलांतरित कामगार व आर्थिक दुर्बल घटकांना लक्षात घेऊन 5 किलोचे 1 लाख 87754 फ्री ट्रेड एलपीजी सिलिंडर आणि 2 किलोचे 15335 सिलिंडर पुरवले आहेत. डिजिटल माध्यमांचा वापर सेवा वितरणात महत्त्वाचा ठरत असून, आयव्हीआरएस, एसएमएस, एचपी पे आणि व्हॉट्‌‍सॲपच्या माध्यमातून 95 टक्के एलपीजी बुकिंग करण्यात आले.

राज्यात इंधन, एलपीजीचा तुटवडा नाही

ग््रााहकांच्या हितसंरक्षणासाठी आणि वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राखण्यासाठी एचपीसीएलने अंमलबजावणी अधिक कडक केली आहे. काही ठिकाणी वाढलेल्या मागणीमुळे तात्पुरता ताण जाणवत असला तरी राज्यासह देशभरात इंधन किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे एचपीसीएलने स्पष्ट केले आहे. ग््रााहकांनी घाबरून खरेदी न करता नियमित वापराची पद्धत कायम ठेवावी असे आवाहन कंपनीने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT