महाराष्ट्रातील अनेक ठिकाणा पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा File Photo
पुणे

Rain Update : मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राला चार दिवस अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याता अंदाज

पुढारी वृत्तसेवा

पुणे, पुढारी वृत्तसेवा : केरळ ते कोकण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मान्सून वाऱ्याचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका झाला आहे. त्यामुळे या संपूर्ण किनारपट्टीला आगामी 24 तास पूरस्थितीचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबईसह कोकण, मध्यमहाराष्ट्राला आगामी चार दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या चोवीस तासांपासून राज्यात चांगला पाऊस सुरू आहे. प्रामुख्याने मुंबईसह कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टी सुरू आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात मुसळधार ते मध्यम पाऊस सुरू झाला आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने केरळ, कर्नाटक, कोकण, गोवा, गुजरात या किनारपट्टीला सतत रेड अलर्ट देण्यात येत आहे. आगामी 24 तास पुन्हा या संपूर्ण किनारपट्टीला पुराचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

मान्सूनचे कुंड मध्य भारतावर सक्रिय आहे. बंगालच्या उपसागरापासून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीय स्थिती तयार झाल्याने वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 कि.मी इतका वाढला आहे. त्यामुळे ज्या भागात कमी दाबाचा पट्टा आहे तेथे गडगडाटी वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार तर राज्याच्या उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल.

कोकणात 42 ठिकाणी अतिवृष्टी

कोकणातील सुमारे 42 गावांत गेल्या 24 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात पाच ठिकाणी 200 मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्रात सहा, घाटमाथ्यावर पाच, विदर्भात आठ, तर मराठवाड्यात पाच ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. आगामी चार दिवस म्हणजे 12 जुलैपर्यंत मुंबई, कोकण, घाटमाथा आणि मध्यमहाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी राज्यात अशी झाली अतिवृष्टी विभागातील अतिवृष्टीची ठिकाणे

  • कोकण : 42

  • मध्यमहाराष्ट्र : 06

  • मराठवाडा : 06

  • विदर्भ : 08

  • मराठवाडा : 05

24 तासांतील राज्यातील पाऊस (मि.मी.मध्ये)

कोकण : राजापूर 230, सांगे,221, वेंगुर्ला 215, मालवण 214, मडगाव 212, देवगड 198, कणकवली 193, दापोली 192, काणकोण 191, फोंडा 190 वैभववाडी 185, सावंतवाडी 183, केपे 175, हर्णे 172, चिपळूण 172, लांजा 158, अलिबाग 145, मालगुंड 145, श्रीवर्धन 131, मंडणगड 130, वसई 126, खेड 121, ठाणे 119, संगमेश्वर देवरुख 110, सावडे 95, रोहा 93, माणगाव 92, पनवेल 90, गुहागर 87, ठाणे 75, रत्नागिरी 74, पोलादपूर 56, उरण 54, महाड 53,माथेरान 52, पाली 48,

मध्य महाराष्ट्र: गगनबावडा 194, चांदगड 127, पंढरपूर 67, शाहूवाडी 60, यावल 55, महाबळेश्वर 55, आजरा 47, मोहोळ 44, जामखेड 38, लोणावळा 38, मंगळवेढा 38, वाई 33, शिरपूर 32, कोकरूड 32, पन्हाळा 28,इगतपुरी 22, शिराळा 22, कोल्हापूर 21, कागल 21, शिरोळ 20, पेठ 20, गडहिंगलज 18.

मराठवाडा : अर्धापूर 73, तुळजापूर 67, अर्धापूर 65, मुखेड 64, जळकोट 51, वैजनाथ 45, कंधार 41,पाटोदा 40, गंगाखेड 37, रेणापूर 36, पालम 36, वबल्लोली 34, नांदेड 32, देगलूर 31, नायेगाव खैरगाव 31,हदगाव 30,वाशी 26.

विदर्भ : अकोला 122, खामगाव 92, बाळापूर 91, मोताळा 90, बुलडाणा 62, अमरावती 58, बाशीटकली 54, देवळी 51, तेल्हारा 47, मारेगाव 46, नांदरुा 44, गोंदिया 42, दारव्हा 42, वाणी 41, चांदुर 38, पातूर 37, मालेगाव 37, पांढरकवडा 34, मेहेकर 34, अकोट 31,चिखली 31, मलकापूर 27, बाबुळगाव 27, जळगाव 26, राळेगाव 24,

घाटमाथा : धारावी 160, कोयना (पोफळी) 149, ताम्हिणी 112, कोयना (नवजा) 104, डुंगरवाडी 102, दावडी 94, भिरा 76, शिरगाव 60, अंबोणे 52, वळवण, खंद 33

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT