पुणे: राज्यात मुसळधार बरसत असलेल्या मान्सूनची गती थोडी मंदावली आहे. दरम्यान, कोकणच्या काही भागात मुसळधार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलका तर विदर्भात हवामान विभागाने ’यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल राजस्थान, बिहारच्या दिशेने झाली असून, काही भाग व्यापला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग, गुजरातचा उर्वरित भाग, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेशाचा काही भाग, पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखडचा उर्वरित भाग, तसेच बिहारच्या बहुतांश भागात पोहचला आहे. (Latest Pune News)
पुढील 24 ते 48 तासात मान्सूनची आणखी आगेकूच होण्यास अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे अजून मान्सून पुढे सरकणार आहे. दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, कोकणच्या काही भागात मुसळधार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलका तर विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
असे आहेत अलर्ट (कंसात दिनांक)
ऑरेंज अलर्ट :- रायगड (19), रत्नागिरी (19), पुणे घाटमाथा (19), सातारा घाटमाथा ( 19).
यलो अलर्ट : ठाणे (19, 21, 22), मुंबई (19, 22), रायगड (20 ते 22), रत्नागिरी (20 ते 22), सिंधुदुर्ग (19 ते 22), नाशिक घाटमाथा (19), पुणे घाटमाथा (20 ते 22), सातारा घाटमाथा (20 ते 22), छत्रपती संभाजीनगर (19), जालना (19), परभणी (19, 20), हिंगोली (19, 20), नांदेड (19, 20), अकोला (19 ते 22), अमरावती (19 ते 22), भंडारा (19 ते 22), बुलढाणा (19 ते 22), चंद्रपूर (19 ते 22), गडचिरोली (19 ते 22), गोंदिया (19 ते 22), वर्धा (19 ते 22), वाशिम (19 ते 22), यवतमाळ (19 ते 22).
असे आहेत कमी दाबाचे पट्टे आणि द्रोणीय स्थिती
पश्चिम बंगालच्या गॅगस्टीकजवळ असलेला कमी दाबाचा पट्टा पुढील 24 तासांत झारखंड पार करून पुढे जाणार आहे. राजस्थानच्या मध्य भागात आणखी एक कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. पंजाब ते उत्तर गुजरात पार करून राजस्थानपर्यंत द्रोणीय स्थिती कार्यरत आहे.