Ajit Pawar: ‘माळेगाव’ने दिला राज्यातील 200 कारखान्यांपेक्षा उच्चांकी अ‍ॅडव्हान्स; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने निरावागज (ता. बारामती) येथील प्रचार सभेत पवार बोलत होते
Ajit Pawar
माळेगाव’ने दिला राज्यातील 200 कारखान्यांपेक्षा उच्चांकी अ‍ॅडव्हान्स; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन Pudhari File Photo
Published on
Updated on

शिवनगर : माळेगाव साखर कारखाना राज्यात अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. सहकाराला दिशा देणार्‍या या कारखान्याने राज्यातील 200 खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत मागील गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला उच्चांकी अ‍ॅडव्हान्स दिला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. माळेगाव कारखाना पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने निरावागज (ता. बारामती) येथील प्रचार सभेत पवार बोलत होते.

पवार म्हणाले की, राज्यातील अनेक साखर कारखाने असे आहेत, जे 2500 रुपये प्रतिटन ऊसदर देतात. मात्र, माळेगाव कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने मागील पाच वर्षांत सातत्याने उच्चांकी ऊसदर दिला आहे. असे असताना विरोधक माझ्यावर सहकार मोडीत काढण्याचा आरोप करीत आहेत. मी सहकाराला बळकटी, ताकद आणि मजबुती देणारा आहे. त्यामुळे माझ्या आधिपत्याखालील माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखाने हे सहकारातील उच्चांकी ऊसदर देणारे कारखाने म्हणून ओळखले जातात.

Ajit Pawar
Malegav Sugar Factory: पाच वर्षे खिसे फाटेपर्यंत पैसे देणार; सहकारमहर्षी चंद्रराव तावरे यांचा सभासदांना शब्द

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी विरोधकांकडून कारखाना आपल्या ताब्यात आला, त्या वेळी विरोधकांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारखाना चालविल्यामुळे शेवटच्या वर्षी साखर उतारा केवळ 10.61 असा होता, तर तोच कारखाना आपल्या ताब्यात आल्यानंतर विक्रमी गाळप करून पावणेबारा बारा टक्के साखर उतारा मिळविला. त्यामुळे शेतकरी सभासदांना सातत्याने अधिकचे पैसे देता आले. मी जर सहकार मोडीत काढायला निघालो असतो, तर तालुक्यातील सहकारी संस्था यामध्ये दूध संघ, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे कामकाज पाहा. शासनाच्या माध्यमातून या सर्व संस्थांना मी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. काही संस्थांच्या माध्यमातून पेट्रोल पंप उभे केले आहेत. दूध संघाच्या माध्यमातून उपपदार्थांची निर्मिती करीत या संस्था अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळे माझ्या शब्दाला किंमत आहे. माळेगाव कारखान्याला 250 कोटी रुपयांचे आयटीचे पत्र आले होते, त्यातून कसा मार्ग काढला हे संचालक मंडळाला विचारा, असे म्हणत पवार यांनी बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास केल्याचा दावा केला. यामध्ये रस्ते, पूल, रेल्वेमार्ग, पालखीमार्ग, एसटी स्टँड, विमानतळ आदींबाबत सखोल विवेचन देत बारामती तालुक्याचा नावलौकिक वाढविण्याचे काम केल्याचा अभिमान असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. माळेगाव कारखान्याची संलग्न असलेल्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील अंतर्गत रस्ते जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून तयार केले. याबाबत संस्थेला एक रुपयाची तोशीस लागू दिली नाही, असे पवार यांनी सांगितले. आपण एआय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेळेची, पाण्याची आणि पैशाची बचत करीत ऊस उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले. त्यामुळे या निवडणुकीत श्री निळकंठेश्वर पॅनेलला बहुमताने विजयी करा, असे आवाहन पवार यांनी केले.

Ajit Pawar
Sharad Pawar Statement | माळेगाव निवडणूक ही स्थानिक; टोकाची भूमिका घेणे गरजेचे नव्हती! शरद पवार

अण्णा... काका... झाले आता दादा

प्रत्येकाचा काळ असतो. एक काळ चंद्ररावअण्णांचा होता, तसाच रंजनकाकांचा होता; आता मात्र दादांचा काळ आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देतो, माळेगाव कारखान्याची कामगार वसाहत, अंतर्गत रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर देऊन कारखान्याच्या परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. हे करताना ऊसदरावर परिणाम होऊ देणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news