पुणे
Jejuri Accident : कार-पीकअपचा भीषण अपघात, एका महिलेसह 9 जणांचा जागीच मृत्यू
4 जण जखमी, जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील घटना
जेजुरी : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर किर्लोस्कर कंपनीसमोर बुधवारी (दि. १८) रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेसह 9 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावरील किर्लोस्कर कंपनी समोरील श्रीराम हॉटेलबाहेर पीकअप टेम्पोमधील साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. यावेळी जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या कारने पीकअपला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतून साहित्य खाली उतरविणारे, हॉटेलमधील मालक व कारमधील व्यक्ती तसेच एका महिलेसह 9 जण जागीच ठार झाले. यासह 1 बालक, 1 महिला व 2 पुरुष गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृतांची व जखमींची नावे अद्याप कळली नाहीत. घटनास्थळी जेजुरी पोलिसांनी तातडीने जाऊन जखमी व मृत व्यक्तींना दवाखान्यात दाखल केले आहे.

