झिका रुग्णांच्या एक कि. मी. परिसरात फवारणी File Photo
पुणे

Zika Virus| झिका रुग्णांच्या एक कि. मी. परिसरात फवारणी

पुढारी वृत्तसेवा

पुढारी वृत्तसेवा शहरामध्ये झिका या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. यामध्ये दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. झिकाचा संसर्ग वाढू नये, यासाठी रुग्ण आढळलेल्या घराच्या एक किलोमीटर परिसरातील घरांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे,

अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. दरम्यान, नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

शहरात एरंडवणा आणि मुंढवा परिसरात झिकाची लागण झालेले सहा रुग्ण आढळले आहेत. एरंडवणा परिसरातील बाप लेकीला झिकाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या परिसरातील १२ नागरिकांचे ब्लड सैंपल प्रयोगशाळेत पाठविले होते.

त्याचे रिपोर्ट आले असून यामध्ये दोन गरोदर महिलांनाही झिकाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर मुंढवा येथे महिन्याभरापुर्वी एका महिलेला

झिकाची लागण झाली होती. ही महिला उपचार घेत असलेल्या खासगी रुग्णालयाने ही बाब विलंबाने महापालिकेला कळविली. त्या ठिकाणी आणखी एक रुग्ण आढळला आहे. डॉ. बळीवंत म्हणाल्या, सर्व उमेदवारांची प्रकृती स्थिर आहे.

सर्वांना सौम्य लक्षणे आहेत. डेंग्यूचा आजार पसरविणारे एडीस एजिप्टी डासांपासूनच झिकाचा फैलाव होतो. स्वच्छ पाण्यात पैदास होणाऱ्या एडीस एजिप्टी डासांच्या प्रजननासाठी पावसाळी वातावरण पूरक आहे.

परंतु प्राथमिक खबरदारी म्हणून रुग्ण आढळलेल्या परिसरातील एक कि.मी. परिघातील घरांमध्ये धूर फवारणी करण्यात येत आहे. एनआयव्हीच्या केंद्रीय अधिकाऱ्यांनीही आज झिकाबाबत महापालिकेच्या डॉक्टरांना मार्गदर्शन केले असून नागरिकांनीही योग्य ती काळजी घ्यावी, असेही डॉ. बळीवंत म्हणाल्या.

ही काळजी घ्या

  • घरातील मनीप्लैंट, फ्रीजच्या मागील ट्रेमध्ये फारकाळ स्वच्छ पाणी साठू देऊ नका.

  • छतावर रिकाम्या वस्तूंमध्ये तसेच घराच्या परिसरातील टाकाऊ वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठणार नाही, याची दक्षता घ्या.

  • झिकाचा डास दिवसाच चावतो, त्यामुळे दिवसभर अंगभर कपडे वापरावीत.

  • दिवसा मच्छरदानी किंवा डास प्रतिबंधित साधनांचा वापर करावा.

  • गरोदर महिलांना ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT