Maharashtra Assembly Monsoon Session : अंबादास दानवे यांचे निलंबन करा : प्रसाद लाड

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन
Maharashtra Assembly Monsoon Session
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. file photo
Published on
Updated on

शासनाने उचित कारवाई करावी

दीक्षाभूमीच्या भूमीगत पार्किंगबाबतच्या कामाला स्थगिती दिली असून शासनाने उचित कारवाई करावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

स्थगिती नको काम रद्द करा : वडेट्टीवार

नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा सोमवारी चिघळला. आंबेडकरी अनुयायांनी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी तोडफोड करीत बांधकामाला विरोध केला. या घटनेचे पडसाद नागपूरबरोबरच मुंबईमध्ये विधिमंडळ परिसरात उमटले. स्थगिती नको काम रद्द करा, या कामाच्या पाहणीसाठी समिती नेमावी तसेच उर्वरीत १५ हेक्टर जागा दिक्षाभुमीला द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

लाडांनी सभापतींकडे माझी तक्रार करावी : दानवे

भाजपने मला नियम शिकवण्याची गरज नाही. मी पळकुटा नाही. प्रसाद लाड यांनी सभापतींकडे निलंबनाची मागणी करावी. आता त्यांना कायदे, नियम, संविधान आठवत आहे हे चांगलं आहे. मी मात्र शिवसैनिकाच्या बाण्यानचं उत्तर देणार, असे दानवे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

लाड यांच्याकडून दानवे यांच्या निलंबनाची मागणी

प्रसाद लाड यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे निलंबन करावे. त्यांच्यावर धमकीचा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणी केली आहे.

राहुल गांधी यांनी माफी मागावी

राहुल गांधी यांनी माफी मागावी, हिंदुंचा अपमान सहन करणार नाही, असे फलक हातात घेऊन सत्ताधाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपचं आंदोलन

विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने आज आंदोलन केले. राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यविधिमंडळाच्या अधिवेशनासोबतच दिल्लीत लोकसभेचेही अधिवेशन सुरू आहे. सोमवारी या अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एका धर्मियांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी हंगामा केला. त्याचे लोण थेट राज्य विधिमंडळाच्या विधान परिषदेत पोहोचले आहेत. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा सदस्य प्रसाद लाड यांना अपशब्द वापरले. प्रत्युत्तरादाखल लाड यांनीही दानवे यांना अशाच प्रकारे शब्द वापरल्यावरून सभागृहात गोंधळ झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news