पुणे

बलात्कार करणाऱ्यांना फाशीवर लटकावणे हे आमचे हिंदुत्व : आदित्य ठाकरे

Laxman Dhenge

तळेगाव स्टेशन:पुढारी वृत्तसेवा :  तळेगाव दाभाडे येथील रविवारी(दि.२१)झालेल्या सभेत राज्य सरकारच्या गेल्या दोन वर्षातील कारभारावर कडाडून टीका करत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी स्थानिक रोजगाराचा प्रश्न शासनाच्या गुजरातधार्जिण्या प्रवृत्तीमुळे निर्माण झाल्याचा आरोप केला. सुमारे लाखाच्यावर बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता असलेली तळेगाव एमआयडीसीत होऊ घातलेली वेदान्त फॉक्सकॉन कंपनी गुजरातला दिली.

ही कंपनी जर तळेगावात सुरू झाली असती, तर त्या बरोबर इतर १६० कंपन्याही महाराष्ट्रात आल्या असत्या तसेच मागील पावणे दोन वर्षात एकही नवीन उद्योग महाराष्ट्रात आणला नाही. यामुळे राज्याचे सर्वाधिक आर्थिक नुकसान झाले असल्याचा दावारोप आदित्य ठाकरे यांनी जाहीर सभेत केला.बलात्कार करणा-यांना फाशीवर लटकावणे हे आमचे हिंदुत्व तसेच हृदयात राम आणि हाताला काम हे आमचे हिंदूत्व असे ठाकरे यांनी सांगितले.यावेळी मावळ, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर, मावळ लोकसभा शिवसेना संघटक तथा माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, अनिकेत घुले, अशोक खांडेभरड, शैलेश मोहिते, तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, शहर प्रमुख शंकर भेगडे, मदन शेडगे, योगेश बाबर, शांताराम भोते, दत्तात्रय भेगडे राजेंद्र नवले आदी उपस्थित होते. आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, की सत्तेत आलेले लोक जनरल मोटर्सच्या संपकरी कामगारांच्या बाजूने बोलत नाहीत "बायकॉट बॉलिवूड" म्हणणाऱ्यानी फिल्म फेअर अवॉर्ड गुजरातमध्ये नेला. यावेळी गौतम चाबुकस्वार,संजोग वाघेरे-पाटील आणि सचिन अहिर यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रभाकर पवार यांनी केले. आशिष ठोंबरे यांनी स्वागत केले. अनिल कुंभार, मदन शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश गायकवाड यांनी आभार मानले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT