Maratha Reservation : मनोज जरांगेंचा मोर्चा आज पुण्यात

Maratha Reservation : मनोज जरांगेंचा मोर्चा आज पुण्यात
पुणेः पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला मोर्चा मंगळवारी (दि. 23) नगर रस्त्यावरील खराडी परिसरात दाखल होणार आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी रांजणगाव येथून निघून कोरेगाव भीमामार्गे खराडी येथे मुक्कामी थांबणार आहे. तर, खराडी येथून बुधवारी निघून लोणावळा येथे मुक्कामी जाणार आहे. त्यामुळे अहमदनगरकडे जाणारी वाहतूक ही मंगळवारी सकाळी सहापासून आवश्यकतेनुसार वळविण्यात  येणार आहे.
मराठा आरक्षण मोर्चा जसजसा पुढे मार्गस्थ होईल, त्याप्रमाणे मोर्चाचे मागील वाहतूक सुरळीत करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी पर्यायी वाहतूक बदलांचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी
केले आहे.

नगरकडे जाणार्‍या वाहतूक मार्गात बदल

पुणे शहरातून अहमदनगरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने खराडी बायपास उजवीकडे वळण घेऊन मगरपट्टा चौक – डावीकडे वळण घेऊन सोलापूर रस्त्याने यवत केडगाव चौफुला – नाव्हरे – शिरूर मार्गे जातील. चंद्रमा चौक येथून विश्रांतवाडी, आळंदी, मोशी, चाकण, राजगुरूनगर, पाबळ मार्गे शिरूर अशी जाईल. कात्रजकडून येणारी वाहतूक  कात्रज – खडी मशीन चौक- मंतरवाडी फाटा हडपसर मार्गे सोलापूर रस्त्याने केडगाव चौफुला-नाव्हरे शिरूर मार्गे जातील. पिंपरी चिंचवड परिसर व मुंबईकडून येणारी सर्व प्रकारची वाहने  ही तळेगाव, चाकण व नाशिक फाटा, भोसरी, चाकण, राजगुरूनगर, पाबळमार्गे शिरूरकडे जातील.

पुण्याकडे येणार्‍या वाहतुकीत बदल्र

शिरूर ते नाव्हरा मार्गे केडगाव, चौफुला, सोलापूर रस्त्याने हडपसर, पुणे
शिरूर ते पाबळ, राजगुरूनगर, चाकण, भोसरी, पुणे शहर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news