खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर तेरा वर्षांनंतर गजाआड | पुढारी

खून प्रकरणातील फरार आरोपी अखेर तेरा वर्षांनंतर गजाआड

पुणे : खून करून तब्बल 13 वर्ष फरार झालेल्या नाव बदलून विविध राज्यात वावरणार्‍या एकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी राजस्थान येथून बेड्या ठोकल्या. बिट्टी उर्फ शामबाबु छोटेलाल यादव (33, रा. हरा, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दि. 15 मार्च 2011 रोजी सुपरवायझर बाबुराव मोघेकर हे सेनापती बापट रोडवरील अंबिका सोसायटी येथे वॉचमन म्हणून काम करणार्‍या राजा यादव व बिट्टी यादव यांच्याकडे चौकशीसाठी गेले होते. त्याचा वॉचमनला राग येऊन वादावादी झाली.

दोन्ही वॉचमननी बाबुराव विठ्ठल मोघेकर यांना अंबिका सोसायटीतील लिफ्टमध्ये नेउन मारहाण केली. त्यांच्या तोंडात कापडी बोळा कोंबुन व त्यांचे हात व दोन्ही पाय रस्सीने बांधुन खुन करून पसार झाले. त्यातील श्याम बाबु यादव हा स्वतःचे अस्तित्व लपवून व नाव बदलून विविध राज्यांमध्ये वावरत होता. याबाबत चतुःश्रृंगी पोलिसांना आरोपी हा राजस्थानातील झालवाड जिल्ह्यात राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले. तेथून शामबाबुला ताब्यात घेत अटक करण्यात आली. तेथील स्थानिक न्यायालयात त्याला हजर करून पुढे ट्रान्झिट रिमांडद्वारे पुण्यात आणण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे निरीक्षक अंकुश चिंतामण, उपनिरीक्षक अंगत नेमाणे, अमंलदार सचिन कांबळे, सुहास पोतदार, सुधाकर माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button