पुणे: स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय करून घेणाऱ्या मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली.
या वेळी एका महिलेची सुटका करण्यात आली. सौरभ शामराव इंगळे (28, रा. आचल पार्क, काळेपडह, हडपसर) राहुल संजीव देवनाथ (24, रा. आगरवाल बिल्डींग, युनिक स्पामध्ये रविदर्शन, हडपसर मूळ रा. आसाम) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
पुणे- सोलापूर रोडवरील रविदर्शन चौकात असलेल्या आगरवाल कॉर्नरच्या दुसऱ्या मजल्यावर युनिक स्पा सुरू होता.
या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी एका पीडित महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी पीडित महिलेची सुटका करून मॅनेजरसह दोघांना हडपसर पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.