पुणे

पुणे : अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 35 लाखाचा गुटखा जप्त

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडाची वाडी परीसरात गोडाऊनवर छापेमारी करत तब्बल ३५ लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोन टेम्पोसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड आणि पथकाने केली. परिमंडळ 5 च्या हद्दीत हडपसर, लोणी काळभोर नंतर कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर गुटकख्यावर करण्यात आलेली तिसरी मोठी कारवाई आहे. या निमित्ताने गुटखा माफिया पुन्हा ऍक्टिव्ह झाल्याचेच दिसून येत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT