पुणे

पुणे : खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत बोगद्याच्या प्रस्तावाचा मार्ग मोकळा

backup backup

पुणे : पुढारी वृत्तसेवा

खडकवासला धरणापासून ते फुरसुंगीपर्यंत शहरातून वाहणारा मुठा उजवा कालवा बंदकरून त्याऐवजी भूमिगत बोगदा तयार करण्याच्या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजक्ट रिपोर्ट – डीपीआर) करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे.खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी मुठा उजवा कालव्यातून वाहताना त्यामध्ये कचरा आणि इतर घटकांमुळे प्रदूषित होते. खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान शहरातून जाणारा कालवा बंद करून पाणी नेण्यासाठी भूमिगत बोगदा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प झाल्यास त्यातून बचत होणारे पाणी पीएमआरडीएला देण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा खर्च कोणी करायचा? यावर एकमत झालेले नाही. हा प्रकल्प झाल्यास त्यातून तीन टीएमसी पाण्याची बचत होणार आहे.

पुढील काही दिवसांत कालवा वाहत असलेल्या जागेत तपासणीला सुरुवात करणार आहेत. एका खासगी कंपनीकडून हे काम सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला जलसंपदा विभागाकडून सुरुवात करण्यातआली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.कोरोनामुळे या प्रकल्पाचे दोन वर्षांत काहीच काम झाले नाही. आता डीपीआर आणि सर्वेक्षण सुरू झाल्यामुळे प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

प्रकल्पखर्च दोन हजार कोटी

भूमिगत बोगदा करताना ब्लास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. परिणामी शहरातील इमारतींना धोका पोहोचू शकतो. त्यामुळे शहरातील इमारतींच्या खालून बोगदा करण्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. खडकवासला ते फुरसुंगी परिसरातील नागरी वस्ती नसणार्‍या भागातून बोगदा प्रस्तावित करण्यात आला असून, या प्रकल्पासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालव्याची दोन हजार हेक्टर जागा असून, या जागेची किंमत चालू बाजार मूल्य तक्त्यानुसार (रेडीरेकनर) 12 ते 15 हजार कोटी रुपये आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT