मंचर : आंबेगाव तालुक्यात यंदाच्या विचित्र हवामानामुळे द्राक्ष पिकाचे घडच तयार न झाल्याने द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत. सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि बदलते वातावरण या सर्वांचा फटका बागांना बसला असून अनेक शेतकऱ्यांनी मनावर दगड ठेवून द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याचा हृदयद्रावक निर्णय घेतला आहे.(Latest Pune News)
चांडोली बुद्रुक येथील शेतकरी रमेश येळवंडे यांनी काही दिवसांपूर्वीच आपली द्राक्ष बाग जमीनदोस्त केली. त्याच पाठोपाठ कळंब येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे यांचे बंधू आणि द्राक्ष बागायतदार अनिल कानडे यांनीदेखील निसर्गाच्या लहरीपणाला कंटाळून तब्बल दीड एकर जंबो द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवली. कानडे कुटुंबीयांनी सुमारे 7 वर्षांपूर्वी 8 लाख रुपये खर्चून लावलेली बाग नष्ट करताना शेतकऱ्यांच्या मनात असहायता आणि दुःखाचे ढग दाटले होते. एप्रिल ते नोव्हेंबर या 7 महिन्यांच्या कालावधीत अवकाळी आणि सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळाला नाही, परिणामी घडनिर्मतीिच झाली नाही. 80 ते 90 टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्यामुळे आर्थकि गणित पूर्णपणे बिघडले आहे.
द्राक्ष बागेला एकरी 4 लाख रुपये खर्च येतो आणि योग्य परिस्थितीत ही बाग किमान 8 वर्षे चालली असती. मात्र निसर्गाच्या अनियमिततेमुळे आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे द्राक्ष उत्पादकांच्या आशा उद्ध्वस्त झाल्या आहेत. परदेशी निर्यातीवर लावलेली अतिरिक्त करवसुली (एक्साईज ड्युटी) आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थकिदृष्ट्या कोलमडले आहेत. परिणामी अनिल कानडे यांचे सुमारे 40 लाख रुपयांचे नुकसान होणार आहे.
सध्याच्या अनिश्चित हवामानामुळे शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. द्राक्षासारखे महत्त्वाचे पीकसुद्धा निसर्गाच्या लहरीपणासमोर टिकू शकले नाही. शासनाने अशा परिस्थितीत सर्व शेतकऱ्यांना तातडीची आर्थकि मदत द्यावी.प्रमोद कानडे, द्राक्ष बागायतदार