सरकारी आश्रमशाळा, वसतिगृहात विद्यार्थिनींची गर्भतपासणी होते का? प्रकल्प अधिकाऱ्यांचा खुलासा Pudhari
पुणे

Government Ashram Schools: सरकारी आश्रमशाळा, वसतिगृहात विद्यार्थिनींची गर्भतपासणी होते का? प्रकल्प अधिकाऱ्यांचा खुलासा

ही तपासणी करण्यासाठी विद्यार्थिनींची अथवा त्यांच्या पालकांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही, अशा आशयांचे वृत्त विविध प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

government ashram schools student pregnancy test

पुणे: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव कार्यालयाच्या अधीनस्त आश्रमशाळा व पुणे शहरातील वाकड येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना प्रवेश घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करताना गर्भतपासणी (यूपीटी टेस्ट) करावी लागते.

ही तपासणी करण्यासाठी विद्यार्थिनींची अथवा त्यांच्या पालकांची पूर्वपरवानगी घेतली जात नाही, अशा आशयांचे वृत्त विविध प्रसार माध्यमातून प्रसारित करण्यात आले आहे, याबाबत शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहात विद्यार्थिनींची गर्भतपासणी होत नसल्याबाबत प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी खुलासा केला आहे. (Latest Pune News)

घोडेगाव प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात एकूण 23 शासकीय आश्रमशाळा व 24 शासकीय वसतिगृहे असून त्यापैकी मुलींकरिता 11 वसतिगृह आहेत. आदिवासी विकास विभागाच्या 11 नोव्हेंबर 2011 मधील परिशिष्ट-ड मधील मुद्दा क्र.5 अन्वये वसतिगृह प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची शासकीय रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी करण्यात यावी, इतर विद्यार्थ्यांना बाधा होईल असे संसर्गजन्य आजार अथवा गंभीर आजार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे. तथापि यामध्ये गर्भतपासणीबाबत कोणतेही निर्देश किंवा सूचना देण्यात आलेल्या नाहीत.

या कार्यालयचे पत्रक्र.शावगृ-2023-24/प्र.क्र./का.3(6)6200 दि. 3 सप्टेंबर 2024 अन्वये पत्रातील परिशिष्ट ‌’ड‌’ अनु क्रमांक 5 नुसार वसतिगृह प्रवेश देण्यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी होणेबाबत वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा शैल्यचिकिस्तक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, औंध यांना देण्यात आलेल्या गर्भतपासणीबाबत कुठेही नमूद केलेले नाही.

गृहपाल,आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह वाकड यांच्याकडून वैद्यकीय अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच जिल्हा शैल्यचिकिस्तक, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, औंध यांना विद्यार्थ्यांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी करुन मिळण्याबाबत पत्र देण्यात आलेल्या पत्रामध्ये गर्भतपासणीबाबत कुठेही नमूद केलेले नाही. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्याबाबतचा वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये गर्भतपासणीबाबत उल्लेख नाही. यामध्ये ‌’मेंटली आणि फिझीकली फीट‌’ असा उल्लेख आहे

या प्रकरणाच्या अनुषंगाने गृहपाल, आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह वाकड यांनी 28 ऑगस्ट 2025 च्या पत्रान्वये या कार्यालयास खुलासा सादर केलेला आहे. त्यामध्ये वसतिगृह प्रवेशावेळी किंवा प्रवेशानंतर गर्भतपासणी केली जात नसल्यामुळे विद्यार्थिनींच्या पालक अथवा विद्यार्थिनींची पूर्वपरवानगी घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमातील वृत्ताच्या अनुषंगाने विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केवळ आरोग्य तपासणी केली जात असून गर्भतपासणी केली जात नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT