Godzilla El Nino Pudhari
पुणे

Godzilla El Nino: अल निनो अत्यंत वेगाने विकसित होतोय

सुपर अल निनो, गॉडझिला अल निनो ही शास्त्रीय व्याख्याच नाही, या बाबतचे व्हिडीओ खूप चुकीचे; भारतीय हवामान शास्त्रज्ञांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

आशिष देशमुख

पुणे: 'यंदा सुपर अल -निनो तयार झाला आहे, गॉडझिला अल -निनो येत आहे !' अनेक विदेशी शास्त्रज्ञांच्या आवाजात व्हिडिओ व्हायरल होत आहेत. मात्र, अशी कोणतीही शास्त्रीय व्याख्या हवामान शास्त्रात नाही. अल निनो सुपर होतोय, हे खरे आहे. अल निनो अत्यंत वेगाने विकसित होत असल्याने सध्या पाऊस नाही, पण पुढे तो पडू शकतो,'असा दावा भारतीय शास्त्रज्ञांनी केला आहे.

विदेशी शास्त्रज्ञांच्या आवाजात काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यात गत १५० वर्षांतील चार भयंकर अन -निनो पैकी यंदाचा अल निनो हा सर्वांत भयंकर आहे, असा दावा त्यात केला आहे. तसेच यंदाचा अल निनो हा १८७७ नंतर सर्वांत वाईट ठरणार आहे, असेही त्यात म्हटले आहे.

याबाबत आय.आय. टी. एम. पुणे येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल आणि डॉ. आदिती देशपांडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी अल निनोची वास्तविक स्थिती नेमकी काय आहे, या बद्दलची शास्त्रीय माहिती दिली.

अल निनो सक्रिय होण्याची शक्यता किती?

  • अतितीव्र अल-निनो : १३ %

  • तीव्र अल-निनो : २०%

  • साधारण अल -निनो : २७%

  • कमकुवत अल निनो : २३ %

  • तटस्थ राहण्याची शक्यता : १६%

नेमकी खरी स्थिती काय आहे ?

अल निनोची स्थिती सध्या अस्तित्वात आहे. उत्तर गोलार्धातील २०२६-२७ च्या हिवाळ्यापर्यंत ती अधिक तीव्र होण्याची शक्यता

गत महिन्यात ( मे २०२६ ) एल निनोची स्थिती निर्माण झाली; हे मध्य ते पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरातील सरासरीपेक्षा जास्त असलेल्या समुद्रपृष्ठभागाच्या तापमानावरून दिसून येते.

मे महिन्यात पूर्व विषुववृत्तीय पॅसिफिकमध्ये पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त राहिले.

मध्य विषुववृत्तीय पॅसिफिकवर कमी उंचीवरील पश्चिमेकडील वाऱ्यांमधील विसंगती आणि अधिक उंचीवरील पूर्वेकडील वाऱ्यांमधील विसंगती दिसून आल्या.

मध्य आणि पूर्व-मध्य विषुववृत्तीय पॅसिफिकवर संवहन सरासरीपेक्षा थोडे जास्त होते, तर इंडोनेशियावर ते सरासरीच्या आसपास किंवा त्यापेक्षा कमी होते.

पारंपरिक आणि विषुववृत्तीय 'सदर्न ऑसिलेशन' निर्देशांक नकारात्मक होते. एकत्रितपणे, महासागर आणि वातावरण यांच्या परस्परसंबंधित प्रणालीने एल निनो स्थितीच्या सुरुवातीचे संकेत दिले.

'नॉर्थ अमेरिकन मल्टी-मॉडेल एन्सेम्बल' सरासरी असा अंदाज वर्तवते की, उत्तर गोलार्धातील २०२६-२७ च्या हिवाळ्यापर्यंत अल निनो अधिक तीव्र होईल.

अल निनोबाबतचा उच्च विश्वास हा महासागरातील असामान्यपणे जास्त उष्णता साठा आणि विषुववृत्तीय पॅसिफिक महासागरावरील पश्चिमेकडील वाऱ्यांच्या विसंगतींचा विस्तार यांशी संबंधित आहे.

नोव्हेंबर-जानेवारी दरम्यान अत्यंत तीव्र एल निनो येण्याची ६३% शक्यता आहे. हा एल निनो १९५० पासूनच्या ऐतिहासिक नोंदींमधील सर्वात मोठ्या एल निनो घटनांपैकी एक ठरू शकतो.

अत्यंत तीव्र एल निनो घटनांमुळेही सर्व ठिकाणी अपेक्षित परिणाम दिसून येतोच असे नाही, परंतु अधिक तीव्र घटना अपेक्षित परिणामांची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवू शकतात

थोडक्यात सांगायचे तर, सध्या 'एल निनो' स्थिती अस्तित्वात आहे आणि उत्तर गोलार्धातील २०२६-२७ च्या हिवाळ्यापर्यंत ती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

-ही चर्चा 'नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन' (एनओएए ), आणि या संस्थेशी संबंधित संस्था 'नॅशनल वेदर सर्व्हिस' त्यांच्याकडून अर्थसहाय्य प्राप्त करणाऱ्या संस्था यांच्यातील आहे.

पुढील विश्लेषणात्मक चर्चा ९ जुलैला नियोजित आहे.

जे काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत. त्यातील बुहतांश कुणी केले त्याची माहिती, स्त्रोत दिलेले नाहीत ते चुकीचे आहेत. अल निनो अत्यंत वेगाने विकसित होत हे खरे आहे. जून महिन्यातच तो प्रभावीपणे सक्रिय झाला आहे. सामान्यतः अल निनो हिवाळ्याच्या सुमारास पूर्णपणे विकसित होतो; मात्र, हा अल निनो मान्सूनच्या मुख्य हंगामापूर्वी आणि त्या दरम्यानच विकसित होत आहे.
-डॉ. रॉक्सी मथ्यू कोल, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, आयआयटीएम, पुणे
पॅन सुपर अल निनो ही व्याख्या वैज्ञानिक नाही. अल निनोचा प्रभाव जगाच्या वातावरणावर होतो हे खरे आहे. वातावरण बदलामुळे (क्लायमेट चेंज ) हवामान अत्यंत संवेदनशील झाले, हे खरे आहे. त्यासाठी आपण सज्ज राहणे महत्त्वाचे आहे.
-डॉ.आदिती देशपांडे, शास्त्रज्ञ, आयआयटीएम, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT