PMRDA Encroachment Action | पूर्व हवेलीतील अनधिकृत प्लॉटिंग जमीनदोस्त; 'पीएमआरडीए'ची पोलीस बंदोबस्तात कारवाई

प्लॉटिंग व्यावसायिक आणि स्थानिकांकडून राजकीय दबाव व पक्षपातीपणातून कारवाई केल्याचा आरोप
Haveli Illegal Plotting Land Demolished
Haveli Illegal Plotting Land Demolished AI Photo
Published on
Updated on

Haveli Illegal Plotting Land Demolished

लोणी काळभोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) प्रशासनाने पूर्व हवेली परिसरातील अनधिकृत प्लॉटिंगविरोधात मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई करत अनेक ठिकाणी प्लॉटिंगचे काम जमीनदोस्त केले. या कारवाईचे स्वागत होत असतानाच, कारवाई निवडक स्वरूपाची असून राजकीय दबाव व पक्षपातीपणातून करण्यात आल्याचा आरोप काही प्लॉटिंग व्यावसायिक आणि स्थानिकांकडून केला जात आहे.

पीएमआरडीएचे पथक मोठ्या मनुष्यबळासह आणि पोलीस बंदोबस्तात पूर्व हवेली परिसरात दाखल झाल्यानंतर प्लॉटिंग व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. ज्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांनी कारवाई टाळण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, परिसरात सुरू असलेल्या अनेक अनधिकृत प्लॉटिंगपैकी केवळ काही ठराविक ठिकाणीच कारवाई झाल्याचे निदर्शनास आल्याने या कारवाईच्या निकषांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Haveli Illegal Plotting Land Demolished
PMRDA Online Building Permission: पीएमआरडीएची सिंगल विंडो प्रणाली गतिमान; बांधकाम परवानग्या घरबसल्या ऑनलाइन

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही प्लॉटिंग व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर इतर अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अनधिकृत प्लॉटिंगवर कोणतीही कारवाई अथवा नोटीस देण्यात आलेली दिसून आली नाही. त्यामुळे कारवाईची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

काही नागरिकांचा दावा आहे की, सत्ताधारी राजकीय नेते किंवा लोकप्रतिनिधींशी संबंधित अथवा त्यांच्याशी जवळीक असलेल्या व्यक्तींच्या प्रकल्पांवर कारवाई टाळण्यात आली, तर विरोधी भूमिका असलेल्या काही व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

Haveli Illegal Plotting Land Demolished
Pimpri PMRDA Budget 2026: पीएमआरडीएचा ४,६२८ कोटींचा अर्थसंकल्प; मेट्रो-रस्ते विकासाला गती

दरम्यान, पूर्व हवेली परिसरात बेकायदा बांधकामे व अनधिकृत विकासकामांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असतानाही अनेक प्रकरणांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप यापूर्वीही होत आला आहे. अशा परिस्थितीत अचानक झालेल्या या व्यापक कारवाईमुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत विविध स्तरावर चर्चा रंगली आहे.

अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य प्लॉटिंगचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही. मात्र, कायद्याची अंमलबजावणी करताना सर्वांवर समान निकष लावले जावेत, कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा पक्षपातीपणा टाळला जावा आणि दोषींवर समान पद्धतीने कारवाई व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news