पुणे

पुणे : मनरेगाअंतर्गत गावांमध्ये उभारली जाणार गोदामे

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील नागरिकांना मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी गोदामे उभारली जाणार आहेत. त्याची सुरुवात  मावळ तालुक्यातील आडे गावापासून झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पहिल्या गाव गोदामाचे भूमिपूजन करण्यात आले.

जिल्हा परिषदेने यापूर्वी मनरेगा अंतर्गत प्रत्येक गावात गोदामे बांधण्याची घोषणा केली होती. गावातील गोदामामुळे मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार असून, त्यासाठी 14 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या गोदामांमुळे ग्रामपंचायतीला उत्पन्नही मिळणार आहे. शेतकरी शेतीची अवजारे, बियाणे आणि खते यासारख्या निविष्ठा आणि त्यांची कापणी केलेली पिके या गोदामांमध्ये साठवू शकतात. हे कापणीनंतरचे नुकसान कमी करण्यास मदत होईल,असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.

एकदा बांधकाम आणि मान्यता मिळाल्यानंतर, शेतकर्‍यांना बँकांकडून कर्ज मिळू शकते.बागायती आणि धान उत्पादक शेतकर्‍यांना अनुक्रमे मदतसाठी गोदामांना विविध योजनांमधून कोल्ड स्टोअरेज आणि राईस मिल दिले जाऊ शकतात. तसेच जे दुकानदार आठवडे बाजारात धान्य विक्रीसाठी येणार्‍यांना आपले धान्य  गोदामांमध्ये ठेवता येणार आङे. त्यामुळे वाहतूक खर्चात बचत होईल. स्वयंसहाय्यता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्या देखील मनरेगा अंतर्गत गोदाम उभारता येईल, असे आयुष प्रसाद यांनीस सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT