एसआरकेला होकार, आमिरला नकार! | पुढारी

एसआरकेला होकार, आमिरला नकार!

पुढारी ऑनलाईन

आमिर खान आणि करिना कपूर यांचा ‘लाल सिंग चढ्ढा’ आता 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलीवूडचे तीन खान आमीर, शाहरूख, सलमान एकत्रित दिसणार असल्याची चर्चा होती. शाहरूख आणि सलमानचा कॅमियो या चित्रपटात असणार होता; पण ताज्या माहितीनुसार सलमान या चित्रपटाचा भाग नसेल. शूटिंगला वेळ नसल्याने सलमानने नकार दिल्याचे कळते.

सलमानच्या ‘सुलतान’च्या शूटिंगवेळी त्याचे आमिरसोबत बिनसले होते. त्यामुळेच सलमान आमिरला टाळतोय, असे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार चित्रपटाचे शूटिंग आता पूर्ण झाले आहे आणि सलमानने त्याच्याकडे वेळ नसल्याचे सांगितले आहे.

त्यामुळे आमिरनेही सलमानचा भागच कट करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही सलमानचा कॅमियो शूट होऊ शकला नाही. याऊलट सलमानने किंग खानच्या ‘पठाण’साठी मात्र वेळ दिला. ‘पठाण’मध्ये सलमानचा कॅमियो तर सलमानच्या ‘टायगर 3’मध्ये शाहरूखचा कॅमियो असणार आहे. या घडामोडीनंतर सलमानने एसआरकेला होकार दिला; मात्र आमिरला नकार दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Back to top button