पुणे

गिरीश बापट त्या फोटोतून सांगत असणार..: नीलम गोऱ्हेंची धंगेकरांवर टीका

Laxman Dhenge

पुणे : रविंद्र धंगेकरांनी गिरीश बापटांचा फोटो वापरला, याबाबत नीलम गोऱ्हे यांनी  प्रतिक्रिया दिली. गोऱ्हे म्हणाल्या की मला असं वाटतं गिरीश बापट त्या फोटोतून सांगत असणार यांना मतदान करू नका. उलट धंगेकरांनी असं केलं तर निकालाच्या दिवशी त्यांना बापटांच्या फोटोजवळ अश्रू ढाळावे लागतील. यावेळी गिरीश बापटांचा फोटो वापरल्यावरून गोऱ्हेंनी धंगेकरांवर जोरदार टीका केली.

पुढे त्या म्हणाल्या की आपतधर्म म्हणून शिवाजीराव आढळराव पाटलांनी असा निर्णय घेतला असावा, राजकीय गणितं बदलली असल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावा लागला. मात्र ते उमेदवार महायुतीचे असणार, शिवसेनाप्रमुख यांचे आशीर्वाद आहेत त्यांना, ते नक्कीच निवडून येतील. विजय शिवतारे यांच्याशी मुख्यमंत्री संवाद साधत आहेत, त्यामुळे त्यामध्ये मार्ग निघणार आहे. त्यांनी आता थांबलं पाहिजे असे आवाहन आहे. कारवाई होण्याआधी त्यांनी माघार घ्यावी असेही गोऱ्हे म्हणाल्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीबाबत विचारले असता नीलम गोऱ्हे म्हणाल्या की 'लेक लाडकी या घरची होणार सून मी या घरची' अशा एका वाक्यात नीलम गोऱ्हे यांनी बारामतीच्या लढतीवर प्रतिक्रिया दिली.

कात्रज तरुणी आत्महत्या..

आत्महत्या केलेल्या मुलीकडून दोन वेगवेगळी स्टेटमेंट आलेली आहेत त्यामुळे ते प्रकरण थोडंसं गुंतागुंतीचा असून महिला पोलीस अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT