पुणे

भूगोल दिन विशेष : देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एका नकाशावर

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून देशातील प्रमुख श्रीराम मंदिरे एका नकाशावर आणण्याची किमया भूगोलतज्ज्ञ डॉ. सुरेश गरसोळे यांनी साधली आहे. महाराष्ट्र भूगोल समितीतर्फे भूगोल दिनानिमित्त देशातील प्रमुख श्रीराम मंदिरांच्या नकाशाचे लोकार्पण करण्यात आले. अयोध्येत होणार्‍या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त साधून हा नकाशा खास तयार करण्यात आला आहे.

यामध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून महाराष्ट्रातील नाशिक येथील काळाराम मंदिर, रामटेक येथील श्रीराम मंदिर त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर येथील रघुनाथ मंदिर, मध्य प्रदेशातील ओरछा येथील राम राजा मंदिर, कर्नाटकातील चिकमंगळूर येथील कोदंड राम मंदिर, केरळ येथील त्रिशूरमधील त्रिपायर श्रीराम मंदिर, आंध्र प्रदेशच्या हैदराबाद येथील सीता रामचंद्र स्वामी मंदिर, ओरिसा येथील भुवनेश्वर राम मंदिर या निवडक श्रीराम मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ समीक्षक मा. कृ. पारधी यांच्या हस्ते या नकाशाबरोबरच भूगोल संदेश देणार्‍या टी – शर्टचे अनावरण करण्यात आले. डॉ. सुरेश गरसोळे यांनी आपल्या मनोगतामध्ये नकाशानिर्मितीची प्रक्रिया उलगडली. प्रा. मुक्ता गरसोळे- कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अमृत गरसोळे यांनी आभार मानले. अभिनेत्री गात यांनी स्वागतगीत आणि रामगीतार्पण गीताचे सादरीकरण केले.

डॉ. गरसोळे यांनी तयार केला नकाशा

महाराष्ट्र भूगोल समितीचे अध्यक्ष डॉ. सुरेश गरसोळे हे अनेक वर्षांपासून विविध विषयांवरील नकाशे तयार करत आहेत. बालगंधर्व यांच्या नाट्य यात्रेचा नकाशा, राज्यातील नवीन जिल्ह्यांचा नकाशा, राज्यातील अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने अशा वेगवेगळ्या नकाशांचा त्यात समावेश आहे. आता डॉ. गरसोळे यांनी देशातील प्रमुख श्रीराम मंदिरांचा एक नकाशा तयार केला आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT