पुणे

कचऱ्याचा जाळ वडगावामध्ये धुर मात्र तळेगावात : नागरीक त्रस्त

Laxman Dhenge

तळेगाव स्टेशन: पुढारी वृत्तसेवा : वडगाव मावळ येथील संकलीत केला जाणारा घनकचरा वडगाव हद्दीत कचरा डेपो येथे संकलीत करुन प्रक्रिया करुन जाळला जातो तळेगाव स्टेशन येथील श्री. हरणेश्वर टेकडीवरुन पाहणी केली असता असे दिसुन आले आहे की वडगाव येथे संकलीत केला जाणारा कचरा शास्रोक्त पध्दतीने विघटीत न करता जाळला जात आहे. यामुळे पर्यावरणाची हानी तर होतेच तसेच ते नागरिकांच्या आरोग्यासदेखील अपायकारक आहे.

यामुळे तळेगाव दाभाडे वासियांनाही त्रासदायक होताना दिसून येत आहे. कारण सदर कचरा जाळल्यामुळे त्यातून निघणारा धुर हरणेश्वर टेकडी परिसरातील नागरी वस्तीत पसरत आहे. तसेच हरणेश्वर टेकडी जवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान परिसर,हरणेश्वर हॉस्पिटल,नवीन समर्थ विद्यालय,पॉलिटेक्नीक,इंजिनिअरींग कॉलेज आदी ठिकाणी तसेच तळेगाव स्टेशन परिसरात अनेक ठिकाणी नागरीकांपर्यंत जात आहे. यामुळे अनेकांना श्वास घेणे त्रासदायक होत आहे. जेष्ठ नागरिकांना तर याचा फारच त्रास होत आहे. यामुळे वडगाव नगरपंचायत हद्दीतील कचरा विल्हेवाटाची अशी प्रक्रिया तात्काळ थांबवून शास्रोक्त पध्दतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.

वडगाव मावळ येथील कचरा जाळत असल्यामुळे तळेगाव स्टेशन भागात त्रासदायक होत आहे.

चंद्रकांत सावंत, सामाजिक कार्यकर्ते

वडगाव येथील घनकचरा संकलीत करुन जाळण्यात येणाऱ्या कच-याच्या धुरामुळे प्रदुषण होत असुन यामुळे सभोवतालच्या रहिवाशांना त्रास होतो.

सचिन टकले, माजी नगरसेवक तळेगाव दाभाडे नगरपरिषद

हेही वाचा

SCROLL FOR NEXT