India vs England, 4th Test : भारताने चौथी कसोटी ५ गडी राखून जिंकली | पुढारी

India vs England, 4th Test : भारताने चौथी कसोटी ५ गडी राखून जिंकली

पुढारी ऑनलाईन डेस्क : चौथ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताकडून ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल यांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद ७२ धावांची भागीदारी केली. जुरेलच्या बॅटने विजयी धावा केल्या. त्याने दोन धावा घेत सामना जिंकला. जुरेल ३९ धावांवर आणि शुभमन ५२ धावांवर नाबाद राहिला. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने ५५ धावांची खेळी केली.

भारताचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

उपाहारानंतर सलग दोन चेंडूंत भारताला दोन धक्के बसले. भारताच्या दुसऱ्या डावातील ३९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शोएब बशीरने रवींद्र जडेजाला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सरफराज खानला ऑली पोपने झेलबाद केले. जडेजा चार धावा करून बाद झाला. त्याचवेळी सर्फराजला खातेही उघडता आले नाही. सध्या ध्रुव जुरेल आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. भारताला अजूनही ६० हून अधिक धावांची गरज आहे. उपाहारापर्यंत भारताने दुसऱ्या डावात तीन विकेट गमावत ११८ धावा केल्या .

आज भारताने ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताला ८४ धावांवर पहिला धक्का बसला. जो रूटने यशस्वी जैस्वालला जेम्स अँडरसनकरवी झेलबाद केले. त्याला ३७ धावा करता आल्या. त्यानंतर रोहित शर्माही कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला टॉम हार्टलीने बेन फॉक्सच्या हाती झेलबाद केले. रोहितला ५५ धावा करता आल्या. रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरला आणि खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.

रजत पाटीदार पुन्हा अपयशी

भारताला १०० धावांवर तिसरा धक्का बसला. रजत पाटीदार खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. शोएब बशीरने त्याला ओली पोपकरवी झेलबाद केले. रजत या संपूर्ण मालिकेत अपयशी ठरला आहे. संघातील त्याचे स्थान धोक्यात आले आहे. सध्या रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. टीम इंडियाला विजयासाठी अजूनही ९२ धावांची गरज आहे.

भारताला दुसरा धक्का

भारताला दुसरा धक्का ९९ धावांवर बसला. रोहित शर्मा बाद झाला असून त्याने ८१ चेंडूंत ५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ५५ धावांची खेळी खेळली. भारताला विजयासाठी अजूनही ९३ धावांची गरज आहे.

रोहितचे अर्धशतक

रोहित शर्माने कसोटी कारकिर्दीतील १७ वे अर्धशतक झळकावले. त्याने ६९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सध्या भारताची धावसंख्या एका विकेटवर ९० धावा आहे. शुभमन गिलही क्रीजवर आहे. भारताला आता विजयासाठी १०२ धावांची गरज आहे.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला झटका ८४ धावांवर बसला. जो रूटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल ३७ धावा करून बाद झाला. रूटने त्याला अँडरसनकरवी झेलबाद केले. यशस्वीने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. सध्या रोहित शर्मा आणि शुभमन गिल क्रीजवर आहेत. भारताला विजयासाठी अजून १०८ धावांची गरज आहे.

रोहित-यशस्वीची आक्रमक फलंदाजी

भारताने एकही विकेट न गमावता ४० धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि अर्ध्या तासात एकही विकेट न गमावता ८२ धावा केल्या आहेत. सध्या रोहित शर्मा ४५ आणि यशस्वी जैस्वाल ३७ धावांसह खेळत आहेत. रोहित त्याचे कसोटीतील १७ वे अर्धशतकाच्या जवळ आहे.

रविवारी तिसऱ्या दिवशी सकाळी ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव यांनी महत्त्वपूर्ण ७६ धावांची भागीदारी करून इंग्लंडची आघाडी ४६ धावांपर्यंत कमी केली. त्यानंतर भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडचा दुसरा डाव १४५ धावांवर गुंडाळून टीम इंडियाला ड्रायव्हिंग सीटवर आणून बसवले. भारताला विजयासाठी १९२ घावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात भारताने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता ४० धावा केल्या. सामन्याचे अजून दोन दिवस शिल्लक असून विजयासाठी टीम इंडियाला ११८ धावा करायच्या आहेत. (India vs England, 4th Test)

Back to top button