पुणे

Gairan land News : गायरान जमीन वाचविण्यासाठी उद्या देहूगाव बंद

अमृता चौगुले

देहूगाव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : गायरान जमीन वाचविण्यासाठी देहूगाव बंदची हाक देण्यात आली आहे. हा बंद शुक्रवारी (ता.13) रोजी करण्यात येणार आहे. बंदसंदर्भात विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. तीर्थक्षेत्र देहूतील गायरानाची जागा देहूच्या विविध विकासकार्यासाठी अपुरी पडणार आहे. पोलिस आयुक्तालयासाठी पन्नास एकर जमीन देण्याचा निर्णय शासनपातळीवर सुरू आहे.

तीर्थक्षेत्र देहूच्या भविष्यातील विकासकामांचा विचार करून, ही जमीन पोलिस आयुक्तालयास देण्यास देहूच्या नागरिकांचा कडाडून विरोध आहे. त्यासाठी बंद पुकारण्यात आला असून, नगरपंचायत, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षा, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि जगद्गुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संस्थानच्या नावे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

जमिनी आयुक्तालयासाठी

तीर्थक्षेत्र देहू येथील सर्वे नं.97 या गायरान जमीन क्षेत्रातील 50 एकर जागा पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाला देण्यासाठी शासनाकडून हालचाली सुरू आहेत. क्रीडांगण, रुग्णालय, उद्यान, सांस्कृतिक भवन, भक्तनिवास, अन्नछत्रालय, वाहनतळ यासह अध्यात्मिक, गावयात्रा, पालखी सोहळा, श्री संत तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा, कार्तिक यात्रा, बीजसोहळा, आषाढी पालखी सोहळा, आध्यात्मिक, धार्मिक अशा विविध कार्यक्रमासाठी आणि विविध विकासकामांसाठी लागणार आहे. या कामासाठी भविष्यात जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तालयाला जागा देण्यात येऊ नये.

अनेकवेळा पत्रव्यवहार

जागा देण्यासाठी अनेक वेळा विरोध करीत पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यामुळे गायरान जागा देण्यास विरोध दर्शविण्यासाठी शुक्रवारी देहू परिसरात सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील चौकात, परीसरात फ्लेक्स लावण्यात आले आहे. अनेक ग्रामस्थांनी त्यासंदर्भातील व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT