पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची सहा लाख 75 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 30 जुलै ते 4 ऑगस्ट या कालावधीत हिंजवडी येथे घडली. याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी टेलिग्रामवर संपर्क केला. टास्क पूर्ण केल्यास फायदा होईल, असे आमिष दाखवले. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीला सहा लाख 75 हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीने पैसे न देता फसवणूक केली. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.
हे ही वाचा :