खोर: वरवंड (ता.दौंड) येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष अर्जुन (भाऊ) सीताराम दिवेकर (वय ७८ वर्ष) यांचे गुरुवारी (दि. ८ ) निधन झाले आहे.
वरवंड ग्राम शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत अर्जुन दिवेकर यांचा मोलाचा वाटा होता. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कार्यरत व अग्रेसर राहून दिवेकर यांचे शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान लाभले गेले. त्यांच्या पाठीमागे एका मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.
वरवंड ग्राम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दिवेकर, संचालक डॉ .विजय कुमार दिवेकर यांचे ते चुलते आहेत. तर महाराजा ज्वेलर्सचे सर्वेसर्वा प्रशांत दिवेकर यांचे ते वडील आहेत. अर्जुन दिवेकर यांच्या निधनाने वरवंड परिसरात शोककळा पसरली आहे.