Gender Determination Pudhari
पुणे

Baramati Crime: मुलगाच हवा म्हणून विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात; पतीसह चौघांवर बारामतीत गुन्हा

मुलगी असल्याने गर्भपाताचा आग्रह; मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा महिलेचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

बारामती: मुलगाच हवा, या हव्यासापोटी विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यात आला. तसेच, तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी चौघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मुस्कान वसीम मुलाणी (सध्या रा. भांडूप पश्चिम, मुंबई; मूळ रा. जळोची, बारामती) या महिलेने बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिचा पती वसीम मुबारक मुलाणी याच्यासह सासू रुक्साना मुबारक मुलाणी, दीर फारूक मुबारक मुलाणी आणि जाऊ सुहाना फारूक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, फिर्यादीचे पहिले अपत्य मुलगी आहे. त्यामुळे दुसऱ्या वेळी तिच्या गर्भाची लिंगतपासणी करण्यात आली. मुलगी असल्यास गर्भपात करण्याचा आग्रह धरण्यात आला.

फिर्यादीने विरोध केल्यानंतर तिला मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी बारामती बसस्थानकामागे एका हाॅस्पिटलमध्ये तिला साडेतीन महिन्यांचा गर्भ राहिला असतानाही तिच्या इच्छेविरुद्ध तिचा गर्भपात करण्यात आला.

तसेच, अपघातात गर्भपात झाल्याचे सांगून माहेरच्या लोकांची दिशाभूल करण्यात आली. त्यानंतरही शारीरिक आणि मानसिक छळ सुरूच राहिला असल्याचे दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT