Khadakwasla Canal Pollution: ‘पुढारी’च्या बातमीचा दणका! खडकवासला कालव्यातील रासायनिक प्रदूषणाची प्रशासनाकडून दखल

कुरकुंभ एमआयडीसीला पाटबंधारे विभागाचे पत्र; सीसीटीव्ही तपासणी, ईटीपी-सीईटीपी यंत्रणेची पाहणी आणि दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
Chemical Pollution
Chemical PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

पांढरेवाडी: दौंड तालुक्यातील खडकवासला कालव्यात कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील अज्ञात कंपनीकडून रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार दैनिक 'पुढारी'ने उजेडात आणल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली आहे.

Chemical Pollution
Lahuji Vastad Salve Cultural Hall: पुण्यातील लहुजी वस्ताद साळवे सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीवरून वाद; २० लाखांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

या वृत्ताची दखल घेत खडकवासला पाटबंधारे शाखा क्रमांक २, पाटस येथील सहाय्यक अभियंत्यांनी कुरकुंभ एमआयडीसीच्या उपअभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दै. 'पुढारी'च्या बातमीचा प्रशासकीय यंत्रणेवर परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Chemical Pollution
Pune Cycle Track Project: पुण्यात ४५ कोटींच्या सायकल ट्रॅकच्या कामाचा दर्जा संशयात; पहिल्याच थरात रस्ता उखडला!

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील गिरीम (ता. दौंड) येथील नवीन मुठा उजवा कालव्यात अज्ञात कंपनीकडून रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. कालव्याच्या काठावर सांडपाण्याचा थर साचल्याचेही दिसून आले होते. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या जलस्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत दैनिक 'पुढारी'ने २१ नोव्हेंबर रोजी ठळक वृत्त प्रसिद्ध करून प्रदूषणाचा गंभीर प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित केला होता.

Chemical Pollution
CWPRS Pune Water Reservoir Facility: भारतात प्रथमच ९ मीटर उंचीची जलसाठा सुविधा; पुण्यातील सीडब्ल्यूपीआरएसची मोठी कामगिरी

या वृत्तानंतर पाटबंधारे विभागाने कुरकुंभ एमआयडीसी कार्यालयाला पत्र पाठविले आहे. कालव्यात रसायनयुक्त सांडपाणी सोडणाऱ्या कंपनीचा आणि टँकरचा शोध घेण्यासाठी कुरकुंभ एमआयडीसी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने संबंधित कंपनीच्या ईटीपी आणि सीईटीपी यंत्रणेची तपासणी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

Chemical Pollution
Pune Rapido Bike Taxi: पुण्यात रॅपिडोची बाइक टॅक्सी सेवा बंद होणार? कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

विशेष म्हणजे, भविष्यात एमआयडीसी परिसरातून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी कालव्यामध्ये सोडले जाणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबतही पत्रात स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल पुढील पाच दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.