One District One Registration in pune
पुणे : वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन या शासनाने सुरू केलेल्या उपक्रमामुळे शहरासह जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त ग्रामीण भागातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नोंदविण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. दरम्यान शनिवारी आणि रविवारी शहरातील पाच दुय्यम निबंधक कार्यालये सुरु असतात. या कार्यालयांमध्ये आत ग्रामीण भागातील मिळकतींची सुध्दा दस्त नोंदविता येणार आहे. पुणे शहरासह बाहेरील जिल्ह्यातून दस्तनोंदणीसाठी येणा-या नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात मागील काही वर्षापासून औद्योगिकीकरण, माहिती तंत्रज्ञान कपन्यांमुळे वेगाने नागरीकीकरण वाढले आहे. परिणामी बाहेरील जिल्ह्यातील तसेच इतर राज्यातून नागरिक पुणे शहरात राहण्यास प्राधान्य देत आहे. ही बाब लक्षात घेऊन दस्त नोंदणी कार्यालयात असणारी गर्दी तसेच नागरिकांना सोमवार ते शुक्रवार दरम्यान सुट्टी न मिळणे, या पार्श्वभूमीवर शहरात शनिवार-रविवारी दस्त नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्याचा निर्णय मागील काही वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता शहरातील पाच कार्यालये ही शनिवारी -रविवारी सुध्दा सुरु ठेवण्यात आली.
ग्रामीण भागात नागरिक आता रो हाऊस, जमिन, खरेदी करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मिळकतींचे दस्त प्रामुख्याने तालुक्याच्या ठिकाणीच नोंदविले जातात. नागरिकांना आता शनिवारी-रविवारी या सुट्टीच्या दिवशी सुध्दा पुणे शहरातील पाच कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी करता येणार आहे. शहर जिल्ह्यात विविध कंपन्यांमध्ये देखील अनेक नागरिक रोजगारासाठी स्थायिक होत आहेत. तर काहीनी या कंपन्यांच्या आसपास व्यवसाय उद्योग उभारले .या नोक-या आणि व्यवसाय उद्योगांमुळे जमीनीसह सदनिका खरेदी विक्रीचे प्रमाण वाढत आहे.
हवेली क्रमांक 17 - दापोडी - दुपारी 1 ते रात्री 8:45
हवेली क्रमांक 21 - एरंडवणे - सकाळी 7:30 ते दुपारी 3:15
हवेली क्रमांक 22 - एरंडवणे - दुपारी 1 ते रात्री 8:45
हवेली क्रमांक 23 - फोटोझिंको कार्यालय - सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15
हवेली क्रमांक 25 - दापोडी - सकाळी 7:30 ते दुपारी 3:15
वन डिस्ट्रिक-वन रजिस्ट्रेशन यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त शहरासह ग्रामीण भागातील कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नोंदविण्याची सुविधा प्राप्त झाली आहे. शनिवारी आणि रविवारी शहरातील पाच दुय्यम निबंधक कार्यालये सुरु असतात. या कार्यालयांमध्ये आत ग्रामीण भागातील मिळकतींची सुध्दा दस्त नोंदविता येणार आहे.संतोष हिंगाणे-मुद्रांक जिल्हाधिकारी तथ सह जिल्हानिबंधक वर्ग -1 (पुणे शहर )