पुणे: गंगाधाम चौकातील उड्डाणपूल पूर्व-पश्चिम असावा की उत्तर-दक्षिण, या वादात गेल्या तीन वर्षांपासून काम रखडलेले आहे. अखेर वाहतूक पोलिसांनी त्यावर तोडगा काढला असून, हा पूल पूर्व-पश्चिम म्हणजेच बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर उभारण्यात येणार आहे. मार्केट यार्ड येथून कात्रज-कोंढवा रस्त्याकडे जाण्यासाठी ग्रेडसेपरेटर (भुयारी मार्ग) बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर सध्या वाहतुकीचा मोठा भार आहे. मार्केट यार्डमुळे या मार्गावर जड वाहतूक बरीच आहे. शिवाय कात्रज-कोंढवा रस्त्यावरून मार्केट यार्डमध्ये ये-जा करणार्या वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे कात्रज चौकानंतर गंगाधाम चौक हा पश्चिम पुण्यातील सर्वाधिक वाहतुकीचा चौक ठरत आहे. (Latest Pune News)
या ठिकाणी सुमारे दीड हजार सदनिकांची गृहनिर्माण योजना आणि दोन हजार व्यावसायिक गाळ्यांचे खासगी होलसेल मार्केट उभारण्यात येत असल्याने वाहतूक आणखी वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने चार वर्षांपूर्वी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला होता.
तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पांचे डिझाइन आणि अंदाजपत्रक तयार करण्यात आले आणि पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) तत्त्वावर या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याचे ठरले. याअंतर्गत 24 मीटर रुंद बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर उड्डाणपूल, मार्केट यार्डहून कात्रज-कोंढवा रस्त्याकडे जाणारा उत्तर-दक्षिण भुयारी मार्ग आणि झाला कॉम्प्लेक्सपासून आशा माता मंदिराकडे जाणारा 205 क्रमांकाचा रस्ता विकसित करण्यासाठी एकूण 104 कोटींची निविदा काढण्यात आली.
मार्च 2022 मध्ये या निविदेस मंजुरी मिळाली आणि सप्टेंबर 2022 मध्ये वर्क ऑर्डरही देण्यात आली. यावर उपाययोजना म्हणून प्रशासनाने चार वर्षांपूर्वी उड्डाणपूल तसेच भुयारी मार्ग उभारणीचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी प्रशासनाने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचे डिझाइन आणि एस्टिमेट तयार केले.
या दोन्हींचा पीपीपी तत्त्वावर विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला. 24 मीटर रुंद रस्त्यावर बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर उड्डाणपूल उभारणे, मार्केट यार्डहून कात्रज-कोंढवा रस्त्याकडे जाण्यासाठी चौकात उत्तर-दक्षिण असा भुयारी मार्ग बांधणे आणि झाला कॉम्प्लेक्स येथून आशा माता मंदिराकडे जाणारा 205 नुसार रस्ता आखून तो विकसित करणे, यासाठी 104 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली.
निविदेला मार्च 2022 मध्ये मंजुरी देण्यात आली, तर त्याचवर्षी सप्टेंबरमध्ये वर्क ऑर्डर देण्यात आली. मात्र, पूल पूर्व-पश्चिम असावा की उत्तर दक्षिण असावा, यावरून एकमत होत नव्हते. अखेर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने येथील वाहतुकीचे मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी येथील रस्त्यांवरील प्रकारानुसार वाहनांची संख्या, परिसरातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी, लोकसंख्या याचा अभ्यास करून अहवाल तयार केला. त्यानंतर हा पूल पूर्व-पश्चिम असाच करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे या पुलाचे काम लवकरच सुरू होण्याच्या मार्गावर आहे. आधी उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येईल. झाला कॉम्प्लेक्सपासून डोंगराजवळ आखलेला 205 क्रमांकाचा रस्ता आणि बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यालगत 24 मीटर रुंद रस्त्याच्या विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकार्यांनी दिली.