पुणे

Maratha Reservation Protest : 40 गावांतील मराठा बांधवांचे उपोषण

अमृता चौगुले

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच अंतरवाली सराटी (जि. जालना) येथील मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा म्हणून खेड तालुक्याच्या पश्चिम भामा खोर्‍यातील जवळपास 40 गावांतील मराठा बांधवांनी वासुलीफाटा येथे बुधवारी (दि. 1) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. मराठा बांधवांची उपोषणाला प्रचंड उपस्थिती आणि त्यांनी दिलेल्या घोषणांनी वासुली फाटा परिसर दिवसभर दणाणून गेला.

संबंधित बातम्या :

वासुलीफाटा येथे सकाळी 8 वाजता शिवप्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली. तालुक्याच्या पश्चिम भामा खोर्‍यातील व एमआयडीसी भागातील गावच्या मराठाबांधवांनी या उपोषणात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 'कोण म्हणतो देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय', 'आरक्षण आमच्या हक्काचे', 'एक मराठा लाख मराठा', 'मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' या घोषणांनी येथील परिसर उपोषणकर्त्यांनी दणाणून सोडला. तसेच सायंकाळपर्यंत अनेक गावांच्या भजन मंडळांनी भजन केले. उपोषणाचे आयोजन भाजपाचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष काळूराम पिंजन, माजी सरपंच विश्वास बुट्टे पाटील, रोहित डावरे पाटील, तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर, माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शरद निखाडे, शिवाजी डावरे यांनी केले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, भाजपचे सरचिटणीस संजय रौधळ, राष्ट्रवादीचे गणेश बोत्रे, रणजीत गाडे, रवि गाढवे, अंकुश कदम, पोलिस पाटील दीपक राऊत, माजी उपसभापती हिराबाई लिंभोरे, सरपंच शीतल पिंजन, कोमल पाचपुते, पूजा बुट्टे, प्राची लिंभोरे आदींनी उपोषणस्थळी भेट देत पाठिंबा दर्शवला. म्हाळुंगे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT